1 min read

ब्राम्हणशेवगे येथे आईच्या स्मरणार्थ स्मशानभूमीत सारीची रक्षा झाडांना देत केले वृक्षारोपण..
दाभाडे बंधूचा पर्यावरण रक्षणासाठी अभिनव निर्णय..
लाकडांऐवजी गोशाळेतील गोवऱ्यांनी दिला अग्निडाग..

Loading

ब्राम्हणशेवगे येथे आईच्या स्मरणार्थ स्मशानभूमीत सारीची रक्षा झाडांना देत केले वृक्षारोपण..
दाभाडे बंधूचा पर्यावरण रक्षणासाठी अभिनव निर्णय..
लाकडांऐवजी गोशाळेतील गोवऱ्यांनी दिला अग्निडाग..
चाळीसगाव/ प्रतिनिधी

ब्राम्हणशेवगे येथे वृक्षसंवर्धन व पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रम राबविले जातात. जंगलतोड व अनेक कारणांनी लाकड मिळणे दुरापास्त होत असल्याने तसेच अंत्यविधी साठी लाकड (फुल) गोळा करणेही जिकरीचे ठरत आहे. यावर पर्याय म्हणून गोशाळेच्या माध्यमातून गोवऱ्यांच्या सहाय्याने अंत्यविधी करण्यात आला. यामुळे पर्यावरण रक्षणाचाही संदेश दिला तसेच सारीची रक्षा नदीत फेकल्याने होणारे प्रदूषण व दुष्परिणाम टाळता यावे या उद्देशाने सारीची रक्षा नदीत न फेकून देता झाडांना देण्यात येते.
आईच्या स्मरणार्थ स्मशानभूमीत पाचही बंधूनी डॅा. प्रकाश दाभाडे,सेवा निवृत सैनिक तसेच तलाठी राजेंद्र दाभाडे,सैनिक प्रभाकर दाभाडे, ग्रामपंचायत सदस्य यशवंत (पिना)दाभाडे व मुंबई पोलीस रविंद्र दाभाडे, यांनी वृक्षारोपण करत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.याप्रसंगी गावातील तसेच पंचक्रोशीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *