1 min read

ब्राम्हणशेवगे येथे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे प्रयत्नातून सभामंडप मंजूर..
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत सभामंडप बांधकामाचा शुभारंभ..

Loading

ब्राम्हणशेवगे येथे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे प्रयत्नातून सभामंडप मंजूर..
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत सभामंडप बांधकामाचा शुभारंभ..

चाळीसगाव / प्रतिनिधी

ब्राम्हणशेवगे येथे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे प्रयत्नातून पंचविस पंधरा मधून पंधरा लाख रुपये सभामंडप बांधकामासाठी मंजूर करण्यात आले आहेत.आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या प्रयत्नातून व ग्रामस्थ, भजनी मंडळाच्या आग्रहास्तव पंचवीस पंधरा मधून निधी मंजूर करण्यात आला आहे.
या सभामंडप कामाचा शुभारंभ गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत तसेच नवनियुक्त सरपंच सौ.मनिषाताई रत्नाकर बाविस्कर यांचे कार्यकाळातील पहिल्या कामाचा शुभारंभही या निमित्त करण्यात आला.
याप्रसंगी ब्राम्हणशेवगे येथील मा.सरपंच दत्तात्रय पवार, माधवराव बाविस्कर,रत्नाकर बाविस्कर, नगराज पवार,पोलीस पाटील राजेंद्र माळी, संजय बाविस्कर, कैलास शिर्के, नाना भाऊ बाविस्कर, नाना पवार राजेंद्र बाविस्कर, शांताराम शिर्के, बंटी देसले, पिंटुं मिस्तरी, योगेश चव्हाण उपस्थित होते.
सभामंडप मंजूर करुन दिल्याबद्दल आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *