डॉ.शंकर अंदानी यांना कृषी प्रेरणा जीवन गौरव पुरस्काराने गौरव
![]()

डॉ.शंकर अंदानी यांना कृषी प्रेरणा जीवन गौरव पुरस्काराने गौरव
ॲग्रोकेअर कृषिमंच व कृषीभूषण ग्रोवर्स प्रोड्यूसर कंपनी लि. नाशिक प्रस्तुत . कृषि दिन व ॲग्रोकेअर कृषिमंच च्या १६ व्या वर्धापन दिन निमित्ताने महाराष्ट्रातील कृषि उद्योजक व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी AGRIBIZ CONNECT 2023-१६ वा वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार २०२३ वितरण सोहळा नाशिक येथे पार पडला.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना शालेय साहित्य व धान्य वाटप ११ शेतकरी उत्पादक कंपनीचे लोगो अनावरण AGROBIZ APP चे लॉंचींगही करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटक आ. श्री. नितीन पवार यांनी केले.
कार्यक्रम अध्यक्ष मा. श्री. मोहन वाघ,विभागीय कृषि सहसंचालक कृषि विभाग नाशिक हे होते.तर
प्रमुख पाहुणे म्हणून दिपक शिर्के (सुप्रसिद्ध अभिनेता मुंबई ),मा. श्री. प्रमोद रसाळ,मा. श्री. जितेंद्र शहा, श्री. राजेंद्र देवरे,श्री. भूषण परशराम निकम उपस्थित होते. या सोहोळ्याचे
आयोजक रोहिणी पाटील संचालक ॲग्रोकेअर कृषिमंच या होत्या. नाशिक येथील हॉटेल पंचवड प्राईड मध्ये हा सोहोळा उत्साहात संपन्न झाला. डॉ.अंदानी यांच्या कार्याचा आज विशेष गौरव करण्यात आला.त्यांचे कृषि क्षेत्रामधील कार्य महत्वपूर्ण आहे, त्यामुळेच आज त्यांचा हा सन्मान झाला.
अग्रोकेअर कृषिमंच नाशिक शेतकरी फाउंडेशन .511शेतकरी उत्पादक कंपनी तयार करण्यात सहकार्य करून अंदाजे 5 लाख शेतकरी यांचे जीवन बदल केल्या बदलजीवन गौरव प्रदान करण्यात आला. सुप्रसिद्ध अभिनेता दीपक शिर्के,आमदार नितीन पवार,श्री मोहन वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.अहमदनगर येथील सनदी लेखपाल सीए शंकर घनश्यामदास अंदानी यांनी केलेल्या विक्रमी कामाची नोंद देशातील प्रसिद्ध इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात मंदिर, मस्जिद, चर्च आदी 364 धार्मिक स्थळांचे सेवाभावाने केलेल्या कार्याची दखल या रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. नुकतेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या अधिकृत संकेत स्थळावर त्यांच्या कामाची नोंद जाहीर करण्यात आली आहे.
शंकर अंदानी सीए असून, मागील अनेक वर्षापासून समाजकार्य करीत आहे. त्यांनी मंदिर, मस्जिद, चर्च आदी धार्मिक स्थळांच्या ट्रस्टचे काम सेवाभावाने केले. त्यांनी केलेल्या या कामाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली आहे. या रेकॉर्डासाठी राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट कार्य व विक्रम करणारे अत्यंत मोजके व ठराविक व्यक्तींना संधी दिली जाते. यासाठी त्यांच्या कार्याची पूर्णत: छाननी व तपासणी करून विक्रम यादीत नोंद करण्यात येत असते. अंदानी यांच्या रुपाने सामाजिक कार्याबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेले ते पहिले व्यक्ती ठरले आहे.
सीए शंकर अंदानी यांना काही महिन्यांपूर्वी युनायटेड नेशन अमेरिका राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून मेडल ऑफ एक्सलन्स (उत्कृष्ट सेवा कार्याचा) सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. अंदानी यांना जवळपास दीड हजार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. ते शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान व अहमदनगर महानगरपालिकेचे मागील चौदा ते पंधरा वर्षापासून कर सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. अनेक शासकीय संस्था व बँकचे ते लेखापरीक्षक व कर सल्लागार आहेत.

