९७ व्या अ.भा. मराठी साहित्य संम्मेलनासाठी बोधचिन्ह
पाठविण्याचे आवाहान
![]()

९७ व्या अ.भा. मराठी साहित्य संम्मेलनासाठी बोधचिन्ह
पाठविण्याचे आवाहान
अमळनेर प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाव्दारे ९७ वे अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलन हे २ ते४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान, अमळनेर
जि.जळगांव येथील प्रताप महाविद्यालयात होऊ घातले आहे. या संमेलनाच्या बोधचिन्हासाठी खान्देशातील चित्रकारांना मराठी वाङ्मय मंडळ अमळनेर च्यावतीने आवाहन करण्यात येत आहे की, संमेलनासाठी बोधचिन्हाची निमिर्ती
करावयाची आहे.यासाठी खान्देशातील कलावंताकडून “खान्देशी संस्कृती” या
संकल्पनेवर (थीम) आधारित अर्थात खान्देशची कला, साहित्य, संस्कृती
सामाजिकता इत्यादी वैशिष्ट्यांचे प्रतिबिंब उमटणारे बोधचिन्ह मागवित आहोत.
तरी इच्छुक चित्रकरांनी (A4 साईज) मध्ये बोधचिन्ह खालील पत्यावर दि. २०
जुलै २०२३ पर्यंत पाठवावे.
पत्ता – अध्यक्ष मराठी वाङमय मंडळ
रावसाहेब नांदेडकर सभागृह,
न्युप्लॉट, अमळनेर, जि. जळगांव
पिन नं. ४२५४०१ आलेल्या चित्रातून निवड समिती एका बोधचिन्हाची निवड करेल निवडलेल्या बोधचिन्हाचे सर्व अधिकार आयोजक संस्था मराठी वाङ्मय मंडळ अमळनेर यांच्याकडे राहतील. निवडलेल्या बोधचिन्हाच्या चित्रकाराचा साहित्य संमेलनात यथोचित सन्मान केला जाईल. टिप-१) चित्रकाराचे नांव मोबाईल नंबर व आधार कार्ड आवश्यक आहे.
२) प्लास्टिक कव्हरमध्ये लोगो पाठवावा.
३) सदरच्या लोगोची प्रतिकृती (A4 साईज) दि.२०/०७/२०२३ पर्यत
पाठवावी असे आवाहन शरद सोनवणे मो.९४२०१०८३०५, नरेंद्र निकुंभ
मो. ९९२१६३९०७८,सोमनाथ ब्रहमे
मो. ९७३०६७७२३९ यांच्याशी संपर्क साधावा असे मराठी वांग्मय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश जोशी व पदाधिकारी यांनी पत्राद्वारे कळविले आहे..

