अमळनेरला अनिलदादाच्या रूपाने मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव…
![]()

अमळनेरला अनिलदादाच्या रूपाने मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव…
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार अनिलदादा भाईदास पाटील यांनी तालुक्याच्या विकासासाठी ते नेहमीच कटिबद्ध राहिले व विविध विकास कामे केली. आम्हाला शहराचा विकासासाठी काही दिवसापूर्वीच त्यांनी पोलीस वसाहत नूतनीकरणासाठी आंदोलन करत जनतेने पाठिंबा दिल्यामुळे त्यांना त्या आंदोलनात यश मिळाले व काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादीचा राज्य कार्यकारणी कार्यकर्ता मेळावा अमळनेरला संपन्न झाला. त्यात राष्ट्रवादीचे सदासर्वे शरदचंद्रजी पवार, विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयवंत पाटील व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. अमळनेरला अनिलदादांचं कार्य पाहून व त्यांनी विधानसभेमध्ये व अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर तीव्र आंदोलन करत सक्रिय सहभाग नोंदवला याची दखल घेऊन राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांनी नुकताच राजकीय भूकंप करत सत्तेमध्ये सहभागी झाले. अनिलदादा यांच्या रूपाने अजितदादा यांनी मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यामुळे अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये आनंद उत्सव निर्माण झाला. राष्ट्रवादीचे कार्यालयात सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जमून फटाके फोडून नाचत गाचत आनंदोत्सव साजरा केला..
यावेळी अनिलदादा यांच्या पत्नी व मा. जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पाटील यांनी आनंद व्यक्त केला. पहिल्यांदा दादाच्या रूपाने अमळनेर तालुक्याला मंत्रीपद मिळाले व अमळनेरच्या विकास जोरात होईल. यासाठी त्यांनी अजितदादा पवार यांचे धन्यवाद व्यक्त केले..
व सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी फटाके फोडत शहर दणाणून टाकले…



