1 min read

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा निषेध

Loading

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा निषेध

जळगाव : महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद भाऊ सपकाळे यांनी उत्तर प्रदेशातील सहारनपुर या ठिकाणी भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेला भ्याड हल्याचा निषेध केला आहे.
मोदी राजवटीच्या काळापासून वंचित समूहावर अन्याय अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. वंचित बहुजन जगणे या सत्ताधीशांनी अतिशय कठीण करून टाकले आहे. त्याचाच भाग म्हणून उत्तर प्रदेशातील भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष आणि बहुजन समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणारे चंद्रशेखर आझाद यांच्यावर काल रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपुर या ठिकाणी अज्ञातांनी गोळ्या झाडून त्यांना जायबंदी केले.योगी सरकारने या घटनेची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. या घटनेने चंद्रशेखर आझाद घाबरतील आणि न्यायाची लढा सोडून देतील, असे संकुचित वृत्तीच्या आणि रोगट मनोवृत्तीच्या लोकांना ठेचल्याशिवाय आता तमाम बहुजन आणि भीम आर्मीचे लोक स्वस्थ बसणार नाहीत. अशा पद्धतीचा संताप मुकुंद सपकाळे यांनी व्यक्त करून, निषेध व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *