1 min read

विठू नामाच्या गजराने मंगळ ग्रह मंदिर दणाणले. मंदिरात आकर्षक देखावा, दिंडीने वेधले लक्ष.

Loading

विठू नामाच्या गजराने मंगळ ग्रह मंदिर दणाणले. मंदिरात आकर्षक देखावा, दिंडीने वेधले लक्ष.

अमळनेर:-

भेटी लागी जीवा, लागलीसे आस, पाही रात्रीं दिवस, वाट तुझी, संत तुकाराम महाराजांच्या या ओव्यांप्रमाणे २९ जून रोजी आषाढी एकादशी निमित्त श्री मंगळ ग्रह मंदिरात आकर्षक पाने ,फुले व फळांचा देखावा साकारण्यात आला होता. विठू नामाच्या गजरात पालखी सोहळा उत्साहात पार पडला. श्री मंगळदेव ग्रह मंदिरात मंगळ देवाला विठुरायाच्या रूपात सजविण्यात आले होते.मंदिरातील विश्वस्त आणि सेवेकर्‍यांनी सकाळी विठू नामाच्या जयघोष करीत मंगल दिंडी काढली. टाळ,मृदंगाच्या गजरात विठू नामाचे नामस्मरण करीत वारकरी नृत्यही केले. यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस.एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव यांच्यासह मंदिरातील सर्व सेवेकरी व अनेक भाविक सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *