1 min read

मंगळ ग्रह संस्थांनच्या वतीने विद्यार्थ्यांना मिळाल्या मोफत पाण्याच्या बॉटल…

Loading

मंगळ ग्रह संस्थांनच्या वतीने विद्यार्थ्यांना मिळाल्या मोफत पाण्याच्या बॉटल

अमळनेर प्रतिनिधी- अति प्राचीन दुर्मिळ ,भाविकांचे श्रद्धास्थान मंगळ ग्रह संस्थानच्या वतीने अमळनेर तालुक्यातील अनेक शाळातील विद्यार्थ्यांना मोफत पाण्याच्या बॉटल मिळाल्यामुळे अभिनंदन होत आहे.
मंगळ ग्रह संस्थान दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत या मागेही विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू दप्तर वाटप केले होते. यावर्षी विद्यार्थ्यांना मंगळ ग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले व त्यांचे सर्व विश्वस्त मंडळ यांनी तालुक्यातील व ग्रामीण भागातील शाळांना पाण्याची बॉटल दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. अमळनेर तालुक्याचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील व सर्व शाळाचे मुख्याध्यापक,शिक्षक यांनी मंगळग्रह संस्थांनचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांचे मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त केले आहेत.
माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मंगरूळ येथे मंगळग्रह मंदिर व मंगळग्रह सेवा संस्था अमळनेर यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना पाणी बॉटल मोफत देण्यात आल्या तेव्हा मुख्याध्यापक श्री प्रकाश पाटील ,श्री संजय पाटील, श्री अशोक सुर्यवंशी, श्री प्रभुदास पाटील, श्रीमती सुष्मा सोनवणे ,श्रीमती शितल चव्हाण, श्री राहुल पाटील आदी उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *