1 min read

ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी

Loading

ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी
अमळनेर:- ॲड ललिता पाटिल इंटरनॅशनल स्कूल येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य नीरज चव्हाण सर,उपप्राचार्य अश्विनी चौधरी मॅडम व प्री प्रायमरी हेड मंगला चौधरी मॅडम यांनी विठ्ठल रुक्मिणी मुर्तीचे पुजन केले पुष्पहार घालुन फुलांचा वर्षाव केला. ७वी व ८वी च्याविद्यार्थ्यांनी निकिता पाटील व संजीवनी पाटील यांनी भक्तीगीतावर नृत्य सादर केली व पांडुरंगाचे निस्सिम भक्त “गोरोबा कुंभार” ही नाटिका सादर केली. त्यानंतर विद्यार्थी वारकरी संप्रदाय पोशाख परिधान करून आले होते त्यांनी टाळ मृदुंग च्या सुरात विठ्ठलाचा जयघोष करीत दिंडी काढली. अश्या भक्तिमय वातावरणात सगळेच मंत्रमुग्ध झाले. काही क्षणासाठी पंढरीच्या वारीचा अनुभव झाला. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रीन हाऊस ने केले होते. या आषाढी कार्यक्रम प्रसंगी शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *