1 min read

आषाढी एकादशी निमित्त व्ही एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विविध कार्यक्रम

Loading

आषाढी एकादशी निमित्त व्ही एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विविध कार्यक्रम
रामवाडी,अमळनेर येथे सुरू असलेल्या दुर्गा फाऊंडेशन संचलित कै. दादासाहेब व्ही एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आज आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी खूप वेगवेगळे कार्यक्रम सादर केले. त्यानंतर परिसरातून पालखी मिरवण्यात आली. स्थानिक रहिवाशांनी विठोबा रखुमाई ची भक्ती भावे पूजा व आरती केली. कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे लहान बाळगोपालांनी केलेली विठोबा रखुमाई ची वेशभूषा होती. यातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि भक्तिमय वातावरणाची जणू ह्या चिमुकल्यांनी आरास उभी केली होती. मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी लेझिम वाजवून दिंडीला शोभा आणली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना संत सखाराम महाराज वाडी संस्थान येथे नेण्यात आले. व तिथे विठोबा रखुमाई चे दर्शन देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका योगिता फाळके, स्वाती चव्हाण,मनीषा सोनार,पल्लवी येवले,संगीता पाटील,मनीषा शिरसाठ, कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या प्रिसिपल वर्षा सोहिते व पवन पाटील यांनी केले. त्यांना संस्थेच्या सचिव सौ अलका पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *