1 min read

समाजातील विद्यार्थी व तरुणांनी स्पर्धात्मक दृष्टिकोन समोर ठेवून शैक्षणिक प्रगतीचा आलेख निर्माण करावा:डॉ. मनीलाल शिंपी, धुळे शिंपी समाज पंच मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटप. संत शिरोमणी नामदेव महाराज मार्ग व चौकाचा नामाकारणासाठी महासभेत मंजुरी देईल::कल्पना महाले

Loading

समाजातील विद्यार्थी व तरुणांनी स्पर्धात्मक दृष्टिकोन समोर ठेवून शैक्षणिक प्रगतीचा आलेख निर्माण करावा:डॉ. मनीलाल शिंपी, धुळे शिंपी समाज पंच मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटप. संत शिरोमणी नामदेव महाराज मार्ग व चौकाचा नामाकारणासाठी महासभेत मंजुरी देईल::कल्पना महाले

धुळे( प्रतिनिधी )’ मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा’ प्रतिष्ठान मुंबई चे प्रमुख डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी यांच्या संकल्पनेनुसार, ज्ञानगंगा प्रकल्प अंतर्गत, दैनिक स्वराज्य संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील, स्वामीनारायण मंदिर कसे संचालक डॉ. दिनेश ठक्कर, कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे सचिव डॉ. यशवंत म्हात्रे, उद्योजक समाजसेवक डॉ. रामचंद्र देसले, मोटिवेशनल स्पीकर इलेक्ट्रिक इंजिनिअर डॉ. किशोर अढळकर,यांच्या सहकार्याने अहिर शिंपी पंच धुळे संस्थेने बक्षीस वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. अहिर शिंपी पंच संस्थेचे सौ.अरुणाताई प्रल्हादशेठ कापडणेकर शिंपी भुवन ग. नं. ६ धुळे येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. कार्यक्रमास मा.सौ.कल्पनाताई महाले विरोधी पक्षनेत्या मनपा धुळे, .मानव सेवा हीच ईश्वर सेवा प्रतिष्ठान मुंबई चे अध्यक्ष, आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ.मनीलाल शिंपी.हरीश संन्यासी* देविदास टेलर धुळे, माजी जिल्हा समादेशक राजेंद्र जिरेकर* नाशिक पोलीस टाइम्स चे संपादक तुषार बाफना, मा.सौ.सुषमाताई सावळे अखिल भारतीय महिला अध्यक्षा मा.सौ. ज्योतीताई जाधव अहिर शिंपी पंच महिला मंडळ अध्यक्षा मा.सौ.सुषमाताई भांडारकर अहिर शिंपी पंच महिला मंडळ माजी अध्यक्षा हे प्रमुख पाहुणे कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिर शिंपी पंच संस्थेचे अध्यक्ष रमेश शिरसाठ* हे होते.
कार्यक्रमास अहिर शिंपी पंच महिला मंडळ उपस्थित होते. मोठ्या संख्येने विद्यार्थी / विद्यार्थिनी व त्यांचे पालक तसेच समाजातील ज्येष्ठ, वडीलधारी बंधू भगिनी उपस्थित होते. प्रथमतः कार्यक्रमात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त असलेले मा.सौ.मोनिकाताई शिंपी यांचा मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुप तर्फे , सन्मानचिन्ह , शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.इयत्ता दहावी व बारावीच्या प्रथम , द्वितीय , तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. नंतर इ १ ली ते इ १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या,पेन व दप्तर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले, १३० विद्यार्थ्यांनी बक्षीस प्राप्त केले.
सूत्रसंचालन नागेश सावळे यांनी केले.
प्रास्ताविक गुणेशचंद्र सोनवणे यांनी केले. कार्यक्रमास संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली त्यांच्या सहकार्यामुळेच कार्यक्रम यशस्वी झाला.कार्यक्रमास यशस्वी करण्यामध्ये *अहिर शिंपी पंच धुळे* संस्थेचे

अध्यक्ष रमेशभाऊ शिरसाठ
उपाध्यक्ष भालचंद्र भांडारकर सचिव गुणेशचंद्र सोनवणे
सहसचिव प्रवीण जाधव
कार्याध्यक्ष नागेश सावळे
प्रसिद्धी प्रमुख ऋषिकेश अहिरराव
सहप्रसिद्ध प्रमुख मनोहर गांगुर्डे
कार्यालय प्रमुख रवींद्र शिंपी
सहकार्यालय प्रमुख राजेश संन्याशी
संघटक श्री संजय कापुरे
माजी अध्यक्ष
अँड. संजय शिंपी
अँड. सुहास जगदाळे
कार्यकारणी सदस्य
राजेश सोनवणे चंद्रशेखर जगताप , गुलाब संधानशिव.
नरेंद्र वारुळे. या सर्व पदाधिकात्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.पंच संस्थेचे सचिव गुनेशचंद्र सोनवणे यांनी उपस्थित मान्यवरांचे आणि समाज बंधू भगिनींचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *