क्रीडाशिक्षक आर.आर.सोनवणे व उपक्रमशील मुख्याध्यापिका अर्चना सोनवणे कार्यतत्पर व सदैव विद्यार्थ्यांवर स्नेह असलेल्या गोड जोडीचा विवाह वर्धापन दिवस!!
![]()
क्रीडाशिक्षक आर.आर.सोनवणे व उपक्रमशील मुख्याध्यापिका अर्चना सोनवणे कार्यतत्पर व सदैव विद्यार्थ्यांवर स्नेह असलेल्या गोड जोडीचा विवाह वर्धापन दिवस!!
अमळनेर प्रतिनिधी
प्रत्येक पुरूषाच्या यशामागे एक स्त्री असते. आयुष्याच्या काही टप्प्यावर ती आई, बहीण, मुलगी या नात्यातून पाठीशी उभी राहते. मात्र स्त्री जेव्हा पत्नी होते तेव्हा ती आयुष्यच काय सात जन्म साथ सोडत नाही.समाजाने निर्माण केलेलं हे नातं वैवाहिक जीवनात कधी एकरूप होऊन जातं हे तिच्या पतीलाही कळत नाही. कुणाच्या घरची मुलगी अथवा बहीण जेव्हा लग्नानंतर तुमची पत्नी होते तेव्हा तिचं अवघं व्यक्तिमत्वच बदलून जातं. पत्नीची भूमिका सांभाळतांना तिला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. स्वतःचा मूळ स्वभाव, आवडीनिवडी बदलून ती फक्त तुमच्या जीवनाची सहचारिणी झालेली असते. पत्नीला प्रत्येकवेळी मोठमोठ्या भेटवस्तू, महागड्या साड्या, मौल्यवान दागदागिनेच हवे असतात असं नाही. खरंतर तिला हवं असतं निस्वार्थ प्रेम, आदर आणि तिच्या कष्टाची जाणीव असणारं प्रेमळ मन…
पत्नीचे नाते हे जन्मांतरीचे नाते असते. लग्नाच्या पवित्र नात्यात बांधलेले. हे नाते अधिकच दृढ होत जाते.पतीसाठी बायको म्हणजे फक्त त्याची आयुष्याची जोडीदार नाही तर अर्धांगिनी असते.ती प्रत्येक सुखदुःखात साथ देणारी असते असेच मितभाषी शिक्षक पती-पत्नी क्रीडाशिक्षक आर आर सोनवणे सर व ताईसौ अर्चना सोनवणे मँडम अध्यापनाच्या कार्यात आपले कार्य ईमाने इतबारे करत आहेत. मुला-मुलींना योग्य शिक्षणाचे बाळकडू देत त्यांना विद्या विभूषित केले आहे… त्यांचा 24 जून लग्नाचा वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन!….
मा.नानासौ आर .आर सोनवणे
BSCBed
क्रीडा शिक्षक
कै श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्य. विद्या भरवस
लोकमत एक्सलेंट टीचर एवॉर्ड सन्मानित
……………………………………………
ताईसौ अर्चना सोनवणे MABed
मुख्याध्यापिका
जि. प.शाळा भिलाने दिगर ता शिंदखेडा धुळे.
जि प आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका
सरजी व वहीनींना वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द….
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी….. !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी!
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे.!
…तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिर्घ आयुष्य लाभो हीच इच्छा….. ..!
शुभेच्छुक
ईश्वर आर महाजन जिल्हाध्यक्ष
ताईसौ वसुंधरा लांडगे
महीला जिल्हाध्यक्षा
सोपान भवरे तालुकाध्यक्ष
डी.ए सोनवणे शहराध्यक्ष
सौ भारतीताई चव्हाण
महिला तालुकाध्यक्ष
सदस्य
एन.आर चौधरी
पी एस विंचुरकर
मनोहर पाटील
पक्षीमित्र अश्विन पाटील
सल्लागार
दशरथ लांडगे



