1 min read

शाळा कशी चालवणार? मुख्याध्यापक त्रस्त. शिक्षक व्यस्त !

Loading

शाळा कशी चालवणार? मुख्याध्यापक त्रस्त. शिक्षक व्यस्त !

मुंबई विशेष प्रतिनिधी

मुख्य निवडणूक आयोगाने राज्य पातळीवर मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे निवडणूक कामासंदर्भात चे पत्र आज शाळेच्या मुख्याध्यापकांना अनेक ठिकाणी प्राप्त झाले आणि मुख्याध्यापक त्रस्त झालेले आहेत.
अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असतानाही सर्व शिक्षकांना निवडणूक ड्युटी आल्यामुळे शिक्षक ही व्यस्त झाले आहेत. यामुळे यापुढे शाळा कशी चालवावी असा मोठा प्रश्न मुख्याध्यापकांना पडलेला आहे. देशात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने निवडणूक कार्यकारी अधिकारी यांचे पत्र आता सर्व शिक्षकांना मुख्याध्यापकां द्वारा देण्यात आले. लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 कलम 13 ब (2) व कलम 32 यानुसार हे पत्र देण्यात आलेले आहे .निवडणुकीचे काम करताना शाळेचे कामकाज सांभाळून मतदार यादीचे काम करावे असे आदेश देण्यात आल्यामुळे शिक्षकही हवालदिल झालेले आहेत. या निवडणूक कामाची टाळाटाळ केल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 कलम 132 नुसार कार्यालया प्रमुख तसेच संबंधित अधिकारी हे शिक्षेसाठी प्राप्त राहतील अशी सूचनाही या पत्रामध्ये देण्यात आलेली आहे.
मुंबईतील अनेक शाळांमध्ये नव्याने शिक्षक भरती करण्यात आली नाही. शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त आहेत. नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. प्रथम घटक चाचणी सुध्दा झाली नाही व त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण कसा करणार? एका वर्गीत 65 ते 75 मुले आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचे धोरण अवलंबावियाचे का निवडणूक कामे करायची? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे?
निवडणूक, जनगणना व नैसर्गिक आपत्ती या कामातून शिक्षकांना सुटका नाही यामुळेच शिक्षक निवडणूक कामासाठी रुजू ही होतील पण अध्ययन – अध्यापन प्रक्रिया सुरळीत कशी पार पाडणार? असा प्रश्‍न शिक्षक विचारत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *