माणुसकी समुहातर्फे एक दिवशीय कवी संमेलन व सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन
![]()

माणुसकी समुहातर्फे एक दिवशीय कवी संमेलन व सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन
सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम कवी मित्रांना जाहीर आवाहन करण्यात येत की, कवी मंगलदास मोरे लिखित बहरलेला निसर्ग या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्या निमित्त एक दिवसीय कविसंमेलन , कवींचा गुणगौरव सोहळा सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा कवी सेवा गौरव पुरस्कार वितरण व इयत्ता दहावी बारावी उत्तीर्ण
गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी महाराष्ट्रातील कवी मित्रांनी आपला वैयक्तिक बायोडाटा व आता पर्यंत तुम्हाला मिळालेल्या पुरस्काराची माहिती व इयत्ता १० वी १२ वीत ८५ ‘/. टक्केपेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकाची प्रत दि.२३/०६/२०२३ पर्यंत दुपारी १२:३० मीनिटापर्यत पाठवावे 07588928822 या वाट्सअप नंबरवर पाठवावी असे आवाहन करण्यात येत आहे.या कार्यक्रमासाठी सीने अभिनेते येड्याची जत्रा फेम प्रकाश भागवत व विष्णु सुरावसे विनोदि हास्य कलाकार,सुरेश कांबळे आला बाबुराव फेम,तसेस प्रमुख अतिथी स.सो. खंडाळकर,डॉक्टर कैलास झिने, पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे साहेब, प्रशांत पोतदार साहेब, रामेश्वर रेंगे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव, वर्षा व्हगाडे,व माणुसकी समुहाचे सर्व पदाधिकारी व आदि मान्यवर उपस्थित राहनार आहे.हा नियोजित कार्यक्रम दि. २४/०६/२०२३ वार शनिवार या रोजी दुपारी २.०० ते ५.०० या वेळेत मौलाना आझाद संशोधन केंद्र टि.व्ही. सेंटर छत्रपती संभाजी नगर येथे होणार आहे.आयोजक माणुसकी रुग्ण सेवा समुह श्री. सुमित पंडित (समाजसेवक)
सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था छ.संभाजीनगर.

