1 min read

तरुण युवकांना समाजविघातक घटनामधून वाचवायचे असेल तर त्यांना संस्काराची गरज…

Loading

तरुण युवकांना समाजविघातक घटनामधून वाचवायचे असेल तर त्यांना संस्काराची गरज…

विशेष पोलिस महानिरीक्षक परिक्षेत्र नाशिक बी.जी.शेखर पाटील यांचे अध्यक्षीय भाषणातून प्रतिपादन

अमळनेर शहरात धार्मिक व जातीय सलोखा शांतता बैठक संपन्न

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आजची तरुण पिढी सज्जनांची संगत घेण्याचे टाळून दुर्जनांच्या विळख्यात सापडू लागली आहे. त्यामुळे ते व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन उद्ध्वस्त करीत आहेत. पौष्टिक दुधाऐवजी अंमल चढवणा-या मद्याचा ग्लास हातात धरणारी आजची तरुण पिढी गांजा, चरस, गर्द पावडर, हेरॉईन, ब्राऊन शुगर इत्यादी मादक पदार्थाच्या व्यसनात गुरफटत आहे. सोशल मीडियाच्या आहारी जाऊन आपले जीवन उध्वस्त करतांना दिसत आहे. तरुण पिढीवर संस्कार सध्या सध्या कमी पडत आहेत. त्यामुळे अशा घटना घडतात. असे विशेष पोलिस महानिरीक्षक परिक्षेत्र नाशिक विभागाचे बी.जी.शेखर पाटील यांनी अमळनेरला शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये अध्यक्षीय भाषणातून आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
ते पुढे म्हणाले कि शांतता कमीटीची सभा नेहमीच वादळी असते. आपण सर्व नागरिक म्हणतात अमळनेरला काहीच झाले नाही, तरी आम्हाला यावे लागले,कँमरेच्या अँगल पेक्षा माणसाचा दुष्टीकोन चांगला हव हे सांगत मानवतेला अगोदर प्रथम प्राधान्य नंतर बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दंगल झाल्यानंतर शहराचे नाव दिल्लीपर्यंत गेले..शहराला एवढा चांगला इतिहास व भूगोल आहे, तरी अशा घटना घडतात
अशा घटनामधून आपण कारणे शोधली पाहिजे.सध्या तरूण पिढीवर पालकांचा अंकुश राहीला नाही. घरी संस्कार होत नसतील तर समाजासाठी व देशासाठी घातक आहे. अशा दंगलीच्या घटना जर होत असतील येथील उदयोग व्यवसाय बंद पडतील त्यामुळे अमळनेर शहराची शांतता सुव्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी जसी पोलीसांची आहे तसे आपले पण कर्तव्य आहे. आता काही दिवसांनी रात्री अकरा वाजेनंतर सर्व दुकाने बंद ठेवणार आहेत.तरुण युवकांना अशा घटनामधून वाचवायचे असेल तर त्यामध्ये संस्काराची गरज आहे.व देशाची सुरक्षितता व एक कँमरा पोलीसासाठी या मोहीमे अंतर्गत पाच जिल्ह्यात दोन हजार पेक्षा अधिक कँमरे बसवले आहेत असे
विशेष पोलिस महानिरीक्षक परिक्षेत्र नाशिक बी.जी.शेखर पाटील यांचे अध्यक्षीय भाषणातून प्रतिपादन सांगितले.
अमळनेर शहर धार्मिक व जातीय सलोखा शांतता बैठकीत एम.राजकुमार
पोलीस अधिक्षक जळगाव.रमेश चोपडे
उपपोलीस अधिक्षक चाळीसगांव
सुनिल नंदवाळकर डिवाएसपी
विजय शिंदे पोलीस निरीक्षक,
उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर
प्रशांत सरोदे सीवो नगरपरिषद अमळनेर,
आमदार अनिल पाटील,मा.आमदार स्मिताताई वाघ मा.आमदार डॉ बी.एस.पाटील , गोल्ड मेडलिस्ट अतूल ठाकूर होते.
उपपोलीस अधीक्षक रमेश चोपडे म्हणाले की शांततेसाठी सभेची गरज ,शांतताप्रिय शहर होते की काय? असे म्हणावे लागेल कि काय सांगत नागरिकातला पोलीस जागृत होणे गरजेचे आहे. आज अमळनेर ला 550 सिसिटिव्ह कँमरे शहरात बसवले आहेत ही गोष्ट अभिमानस्पद आहे.
तर गोल्ड मेडालिस्ट अतूल ठाकूर म्हणाले की आज देशात सोशल मीडियाचा गैरवापर , व्यसनाधीनताकडे तरुणपिढी आकर्षली जात आहे.सर्वात मोठी समस्या मुलामुळे आहे, संस्कार कमी पडत चालले आहेत,आपली संस्कृती मुलांना शिकवणे गरजेचे आहे. एकमेंकाचे ऐकून घ्यावे असेही सांगत आजची पिढी समोरच्याच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसते त्यामुळे अशा वाईट घटना घडतात असे सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते इमरान खाटीक म्हणाले कि वाईट घटना समाजकंटकांकडून होतात, सोशलमिडियाच्या माध्यमातून अशा घटना होतात तरुण पिढीवर वचक ठेवणे गरजेचे आहे असे सांगितले. तर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे म्हणाले की
दुषीत विचारातून अशा घटना घडतात..
सोशलमिडियाच्या माध्यमातून अशा घटनावर त्वरित समस्येवर उपाय झाले पाहिजे तर अँड शकील काझी म्हणाले की आजच्या पिढीला चांगले व वाईट कळत नाही म्हणून त्याच्यातला हा वाद आहे तर
लालचंद सैनानी मा.उपनगराध्यक्ष म्हणाले की समाज कंटकाकडून अशा वाईट घडल्या आहेत. अमळनेर शहरात पोलिसांना शांतता प्रस्थापित करण्यासाठी यश आले असे सांगितले. तर मा.नगरसेवक प्रविण पाठक म्हणाले की
शहरात सर्व धर्मातील लोक एकोप्याने राहतात, पण काही तरुणांची डोकी व माथी भडकल्यामुळे शहरातील वातावरण खराब होते हे सांगत आज आपण आपले कर्तव्य विसरलो हे सांगितले तर
मा.आमदार स्मिताताई वाघ म्हणाल्या सध्या वाईट प्रवृत्ती वाढत आहे, यामागे कोण हे शोधले पाहिजे, जोपर्यंत आपण आपल्या कुटुंबाला व शेजा-याला आपलं मानत नाही,तोपर्यंत अशा घटना घडतील सानेगुरुजीच्या भूमीत अशा घटना होतात खेद वाटतो या घटनांचे मूळ शोधावे असे मला वाटते असे सांगितले. तर मा.आमदार डॉ बी.एस.पाटील यांनी सांगितले कि पंरपरा ही बदलणार आहे, तरूणामधील राग अशा घटनेमागील कारण आहेत. माणसाला
स्वभावाला औषध आहे,आपण औषध नाही असे म्हणतो ते चुकीचे आहे पण
योगामुळे माणसाचा स्वभाव बदलू शकतो,काही लोक दंगलीचे
राजकीय लोकावर खापर फोडतात साफ चुकीचे आहे. कोणताच पक्ष अशा घटनेचे समर्थन करत नाही असे सांगितले.तर
आमदार अनिल पाटील म्हणाले की
शहरातील दोन मुलांच्या भांडणाला दंगलीचे नाव दिले गेले यामूळे शहराचे नाव बदनाम झाले.अशा दंगलीत समाजाचे हित जोपासणारे यांचा बचाव कसा होईल याचा विचार सकारात्मक पणे करून त्यांना पोलिसांनी न्याय द्यावा तरच आजची शांतता कमीटीची सभा सफल झाली समजावे लागेल. अमळनेर शहरात
पोलीस कर्मचारी यांनी प्रामणिकपणे आपले काम केले त्यांचे मनापासून अभिनंदन करत अमळनेर शहरात
शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करणे प्रत्येकांचे काम आहे असे सांगितले.
तर
पोलीस अधिक्षक राज कुमार म्हणाले की
आम्ही शासनाच्या आदेशाचे पालन केले,अमळनेर शहरातील सेनसीटिव्ह काही भाग बंद होता, व शहरात
संचारबंदी काही तणाव असेल तरच लावली जाते,सानेगुरुजी यांच्या भूमीत अशा घटना होतात आत्मचिंतन करण्याची गरज आहे.मूलांना लाखो रूपायाची गाडी व मोबाईल देतात मग ते आपले का ऐकत नाही?आपणच आपल्या शहराची शांतता आबाधीत ठेवली पाहिजे.निरपराध लोकांवर अन्याय होणार नाहीत हे आम्ही आश्वासन देतो.अमळनेर तालुका सिसिटिव्ह कँमरा लावण्यात जिल्ह्यात प्रथम आहे.सोशलमिडियाच्या माध्यमातून दोन धर्मात तेढ टाकणारा मेसेज व व्हिडीओ टाकला नंतर तुम्ही तो डिलीट केला पण तो सायबरक्राईममध्ये डिलेट करु शकत नाही, म्हणून काळजी घ्या व चुकीचा मेसेज पाठवू नका नाहीतर कारवाईला सामोरे जाल यात आपली सूटका नाही,तुम्हाला शिक्षा होणारच…कायदयानुसार पाचपेक्षा अधिक लोक शांतता भंग करत असतील तर ती दंगलच असते..सण दोन धर्माचे सुध्दा एकत्र येतात मग आपण एकत्र का राहू शकत नाही असे त्यांनी सांगितले.
शेवटी कार्यक्रमाचे आभार पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी मांडले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय पाटील यांनी केले यावेळी अमळनेर शहरातील नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते ,वकील, पत्रकार,विविध संस्थांचे पदाधिकारी ,पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *