1 min read

योगाचा कृतीयुक्त सराव घेऊन योग दिन शारदा माध्यमिक विदयालयात साजरा!!

Loading

योगाचा कृतीयुक्त सराव घेऊन योग दिन शारदा माध्यमिक विदयालयात साजरा!!

जळगाव जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिध्द असलेली कळमसरेतील शाळेत अगदी शिस्तबध्द पध्दतीने योगदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात सुत्रसंचालन किशोर सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या कल्पना सिसोदिया यांनी केले.योगदिनावर सविस्तर विवेचन एस.एच. भवरे सर यांनी योगाची सुरुवात कधी झाली, त्याचे महत्व विशद केले. योगाचा कृतीयुक्त सराव पी.एन. क्षीरसागर सर यांनी घेतले. विद्यार्थ्यांनी मनोवेधक कृती करुन योग केला. त्यात सूक्ष्म हालचाली, विविध प्राणायाम, आसने, घेण्यात आली. शवासनाने समारोप करण्यात आला. सर्व शिक्षक मंडळी कृती करुन योगाचा आनंद घेत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *