1 min read

गावाच्या प्रतिष्टेला तळा जावू देऊ नका..

Loading

डिवाएसपी सुनील नंदवाडकर यांचे अध्यक्षीय भाषणातून शांतता कमिटीच्या सहविचार सभेत प्रतिपादनं

गावाच्या प्रतिष्टेला तळा जावू देऊ नका..

डिवाएसपी सुनील नंदवाडकर यांचे अध्यक्षीय भाषणातून शांतता कमिटीच्या सहविचार सभेत प्रतिपादन

नगरसेवक,सर्वपक्षीय व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची सभा संपन्न

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
9 तारखेला अमळनेरला सानेगुरुजी यांच्या कर्मभूमीत झालेली दंगल शहराच्या प्रतिष्टेला बाधा आणणारी आहे. याचे अमळनेरकर नागरिक म्हणून आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. आपण संस्कार विसरुन चाललो आहोत का? असे कार्यक्रमाचे अध्यक्ष डिवाएसपी सुनील नंदनवन अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना सांगितले.
ते पुढे म्हणाले कि कायदयानुसार प्रत्येक नागरिक हा पोलीस आहे..प्रत्येक नागरिक अधिकार विसरला नाही पण
कर्तव्य आपण विसरलो.पोलीसापेक्षा तुम्ही पावरपूल आहात.. अशा सभा म्हणजे देखावा,तुम्हाला तुमची शक्ती जागृत करावी लागेल.गावाच्या निष्टेला तळा जावू देऊ नका असे सांगत मी तुम्हाला सांगणार नाही पण नेहमीच चांगल्या सूचनांचा विचार करून सहकार्य करेल असे सांगितले.
व्यासपीठावर डिवाएसपी सुनील नंदवाडकर,
पोलीस निरीक्षक विजय शिंदे, नगरपालिकेचे उपकार्यकारी अधिकारी संदीप गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक राकेशसिंग परदेशी होते.
शांतता कमीटीच्या बैठकीत प्रा.अशोक पवार म्हणाले कि आपल्या संरक्षणासाठी ज्यांनी काळजी घेतली ते दंगलीमध्ये जखमी झाले अत्यंत वाईट आहे..
हिंदू व मुस्लिम सोशलमिडियाच्या माध्यमातून द्वेष पसरविण्याचे काम करीत आहेत यावर पालक वर्गाने लक्ष घालण्याची गरज आहे. त्यांनी
अहिल्याबाई होळकर यांचे उदाहरण देत
वाईट घटनेतून अनेकांची घरे उध्वस्त होत आहे. याला जबाबदार कोण हे शोधले पाहिजे असे सांगितले.
अँड ललिता पाटील म्हणाल्या कि
अमळनेर शहर शांत आहे का? अशी ख्याती होती…अमळनेर शहरात महीलांना कोणत्याही प्रकारची भिती वाटत नाही..
सध्या काय चालले आहे?… महापुरुष जयंती साजरी करून काहीच होणार नाही त्यांचे गुण आत्मसात करणे गरजेचे आहे..
सानेगुरुजीच्या अमळनेरला शांतता भंग करण्याचा कोणी प्रयत्न करीत असाल तर कठोर कारवाई करण्यात यावी असे सांगितले पण निरपराध लोकावर अन्याय होत कामा नये असे सांगितले.
अँड शकील काझी म्हणाले कि
शहरातील शांतता दोन तीन महीन्यापासून बिघडलेली आहे.संविधानाच्या हक्काची पायमल्ली नागरिकांकडुन होत आहे.. सध्या फक्त अधिकाराचा वापर करतो पण कर्तव्य विसरलो आहेत असे सांगितले. व
अश्लिल ,दोन धर्मात तेढ निर्माण करणारे
बोगस मेसेज पसरविणा-यावर लक्ष देऊन पोलीस अधिकारी यांनी कडक कारवाई करावी असे सांगितले.व
लोकप्रतिनिधीवर एकतर्फी कारवाई करू नका त्याची माहिती तपासून घ्यावी असे सांगितले.
पत्रकार संजय पाटील म्हणाले की
कोरोना परिस्थितीत मुस्लिम समाजातील नागरिकांचे मोठे काम आहे.तरी अशा घटना का घडतात सांगताना सांगितले की
हि दंगल शहरात दोन धर्माच्या विकृत प्रवृतीची होती असे सांगितले.
मा.नगरसेवक बबली पाठक म्हणाले की
38 वर्षापूर्वी दंगल झाली होती नंतर
सामाजिक मतभेद नव्हते,
सर्व धर्माचे सण उत्साहात साजरा केले जात होते..मग आपसात मतभेद का?
दोषींवर कारवाई करतांना राजकीय हस्तक्षेपाने होत असेल तर पोलीस अधिकारी यांनी विचार करावि असे सांगितले. तर राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष सचीन पाटील म्हणाले की
व्हाटसफ गृपमध्ये दोन पोलीस असावे,चुकीचे मेसेज येणार नाही याची काळजी घ्यावी,दामीनी पथक कार्यरत करा,काँलेजमध्ये छेडछाड सुरू आहे,सट्टा,, क्लब राजेरोसपणे सुरू आहेत लक्ष घालण्याची गरज आहे.दंगलीच्या घटना ग्रामीण भागात होत नाही,तर शहरी भागात का होतात आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असे सांगितले. नंतर
रियाझ मौलाना आरीफ भाया जेष्ठ पत्रकार धनंजय सोनार यांनी मनोगत व्यक्त केले. तर
पोलीस निरीक्षक विजय शिंदे म्हणाले की संस्कारक्षम भूमीत अशा अमंगळ घटना का घडत आहेत.. पालक म्हणून आपण लक्ष देतोय का?मला प्रश्न पडतो हेच अमळनेर मध्ये का?? माझ्या अमळनेरला झालाय काय? ललिता ताईच्या त्या कवितेचा एक एक ओळींमध्ये मर्म होता. माणसाचं धर्म कशाला विचारता.. सम्राट अशोक असेल बाहेरून आलेला सिकंदर असेल याची सगळ्या लढाया झाल्यानंतर त्यांना साक्षात्कार म्हणावा लागेल त्यांनी युद्ध शेवटी थांबवलं. गौतम बुद्ध देखील राजकुमार होते त्यांचा इतिहास जाणून घ्या ते सुद्धा हा रक्तपाताच्या त्या वेळच्या राजांमध्ये युद्ध ते देखील बघून व्यतीत झाले आणि त्यातून त्यांना धर्म कळाला का नाही. कसाई मोहल्लागल्लीमध्ये बाजूला एक हिंदू गल्ली दुसरा बाजूला मुस्लिम गल्ली आहे..तेथे विकायला भाजीपाला विकायला येणा-या मावशी. ती विकतांना विचार करत नाही आणि ती भाजी घेतांना ती महिला विचार करत नाही ..मी तिच्याकडून घेतो असं मला ती भाजी चालणार नाही असा आम्ही विचार करीत नाही,मुस्लीम नागरिकांकडून
नारळ पाणी पितांना हिंदू विचार करत नाही अशा घटना का घडत आहेत असे सांगत अमळनेरकर सर्व समाजातील नागरीकांनी विचार करणे गरजेचे आहे असे सांगितले. सभेचे सुत्रसंचालन गोपनीय अमंलदार डॉ शरद पाटील यांनी केले तर आभार
रणजित शिंदे यांनी मानले व शेवटी शहरात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून प्रतिज्ञा सामूहिक देण्यात आली. यावेळी
मा.नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस पाटील, सर्व पक्षाचे पदाधिकारी,पत्रकार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *