1 min read

अमळनेर बस स्थानकावर एका महिलेची चोरी झालेली बॅग पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्या प्रामाणिकपणेमुळे मिळाली परत….

Loading

अमळनेर बस स्थानकावर एका महिलेची चोरी झालेली बॅग पोलीस उपनिरक्षक शिंदे यांच्या प्रामाणिकपणेमुळे मिळाली परत….

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
प्रामाणिकपणा म्हणजे स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीशी एकनिष्ठ राहून ती जो कौल देईल त्या प्रमाणे वागणे बोलणे कृती करणे. आचार विचार आणि उच्चार यांच्यात सुसंगती असणे म्हणजेच जसा विचार असेल तसेच वागणे आणि तसेच बोलणे. संत समर्थ रामदास स्वामी म्हणतात “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले”! या उक्तीप्रमाणे अंमळनेर बस स्थानकात जवळ आपली ड्युटी इमानी ईदबारी करणारे पोलीस उपनिरीक्षक निंबा शिंदे गेल्या काही वर्षापासून अनेक पुरुष व महिलांचे दागिने पैसे हरवले असतील ते प्रामाणिकपणे त्यांना परत केलेले आहेत.
सविस्तर माहिती अशी कि धुळ्याकडून चोपड्याकडे जाणारी महीला संगीता ताराचंद सोनवणे ही अमळनेर बस स्थानकावर टॉयलेट साठी उतरले असता तिची बॅग बस मध्ये राहिली तिला नंतर समजले तिने बस स्थानकावरील पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्याकडे तक्रार केली शिंदे साहेबांनी तात्काळ बसस्थानकाजवळ त्या गाडीपाशी जवळपास गेले असता त्यांना एका म्हातारी जवळ चार-पाच बॅगा दिसल्या तेव्हा त्यांनी तिला विचारले असता एवढ्या बँगा घेऊन कुठे जातेस? या सगळ्या तुझे आहेत का? तिने सांगितले ही एक बॅग मला सापडली आहे. तेव्हा शिंदे साहेबांनी ती बॅग तिच्याकडून घेतली. बसस्थानकाच्या पोलीस चौकीत आणली असता तिच्यात दोन लाख 75 हजार रुपये होते. तात्काळ त्यांनी पोलीस निरीक्षक विजय शिंदे साहेबांना प्रकार सांगितला, त्यांनी तात्काळ शिंदे साहेब व ज्या महीलेचे पैसे हरवले आहेत तिला म्हणजे संगिता ताराचंद सोनवणे राहणार पडसोद ता.चोपडा हिला पोलीस स्थानकात बोलावले .अगोदर तिला विचारले असता किती पैसे हरवले विचारले असता ते कमी सांगितले. कारण ती घाबरून गेलेली होती व ते सर्व पैसे बीसीचे होते. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या समक्ष निंबा शिंदे यांनी त्या महिलेला ते पैसे परत केले तिला आनंदाश्रू आले व अमळनेर पोलीस निरीक्षक विजय शिंदे साहेबांनी पोलीस उपनिरीक्षक निंबा शिंदे यांच्या प्रामाणिकपणे ची कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. सोशल मीडियावर निंबा शिंदे साहेबांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.