1 min read

जैन साध्वीजी प.पू.अनंतकिर्तीश्रीजी अनंतात विलीन.

Loading

जैन साध्वीजी प.पू.अनंतकिर्तीश्रीजी अनंतात विलीन.
कळमसरे ता.अमळनेर :-
बाल ब्रम्हचारी,खान्देश कन्या,१४० शिष्यांची माता, जैन साध्वीजी प.पू.अनंतकिर्तीश्रीजी महाराज वय ७३ हया मंगळवार ता.२० रोजी दुपारी अहमदाबाद येथे अनंतात विलीन झाल्या.
कळमसरे येथील नेमिचंद मिश्रीलाल कोठारी परिवारात सन १९५२ साली त्यांचा जन्म झाला होता.वयाच्या १८ व्या वर्षीच त्यांनी जैन धर्माची दीक्षा घेऊन,साधुत्व स्विकारले होते.कळमसरे हायस्कूलचे चेअरमन महेंद्रलाल कोठारी व विनोद आणि राजेश कोठारी यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत्या.संपुर्ण भारत पायी पायी भ्रमण करून जैन धर्माचा प्रचार व प्रसार त्यांनी केला.देशभरात त्यांच्या १४० शिष्या/अनुयायी आहेत.
बुधवार ता.२१ रोजी सकाळी ९ वा.जैन सोसायटी अहमदाबाद येथून त्यांची पालखी निघेल.कोठारी परिवाराचे सदस्य व जैन बांधव मोठया संख्येने अमळनेर येथून अहमदाबादला रवाना झाले आहेत.कोठारी परिवारात आतापर्यंत २७ जणांनी जैन धर्माची दीक्षा घेतलेली आहे.स्व.साध्वीजींना शांती लाभो यासाठी कळमसरे शैक्षणिक संकुवात सामुहीक प्रार्थना करणेत आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *