किरण पाटील यांची महाराष्ट्र पोलिस नायगाव मुंबई भरती 2023 मध्ये पोलीस नाईकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार..
![]()
किरण पाटील यांची महाराष्ट्र पोलिस नायगाव मुंबई भरती 2023 मध्ये पोलीस नाईकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार..
सचिनभाऊ पाटील मित्र परिवार यांचा उपक्रम


अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
निसर्डी ता अमळनेर गावातील कु.किरण सुभाष पाटील शिक्षण पदवीधर यांची महाराष्ट्र पोलिस नायगाव मुबई भरती 2023 मध्ये पोलीस नाईक पदी नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन पाटील व मित्रपरिवार यांनी
पेढे भरून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
किरण हा सर्व सामान्य शेतकरी ,कष्टकरी कुटुंबातील असून,यांना ही भरती म्हणजे नोकरी साठी शेवटचा पर्याय राहिला होता कारण या पूर्वी नोकरी मिळवण्यासाठी काही ठिकाणी गेलो असता लाखो रुपयांची मागणी असल्यामुळे माझे काम होऊ शकले नाही अशी व्यथा मांडली म्हणून ही पोलीस भरती शेवटचा पर्याय राहिला होता , खूप मेहनत व जिद्दीपुढे नशिबाला झुकावे लागले आणि पोलीस भरती झालो असे सांगितले , आज कुटुंबात व गावात उत्साह व आनंदाचे वातावरण झाले आहे , किरण दादाच्या या सर्व कर्तृत्व ला सलाम व कौतुक करावे तितके थोडं कार्यक्रम प्रसंगी वडील श्री सुभाष कौतिक पाटील , उपसरपंच श्री कपूरचंद पाटील , श्री संजय पाटील वि का सो सदस्य ,नाटू त्रंबक पाटील, विनोद हिम्मत पाटील, नथु पंढरीनाथ पाटील उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमळनेर , सचिन दादा मित्र परिवारअमळनेर विशेष बोरी परीसर च्या वतीने खूप खुप शुभेच्छा देण्यात आल्या.

