1 min read

मुलाला आयुष्यात सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या आईचा जगाला अखेर निरोप !!

Loading

मुलाला आयुष्यात सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या आईचा जगाला अखेर निरोप !!

रामदेव बडगुजर यांच्या मातोश्री कै. गं. भा. सुशिलाबाई बडगुजर यांचे आज पहाटे वृद्धपकाळाने निधन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
कळमसरे येथील नामांकित शेतकरी व कळमसरे विदया प्रसारक संस्थेचे माजी संस्थापक संचालक कै. चिंतामणशेठ बडगुजर यांच्या धर्मपत्नी व शारदा माध्यमिक विद्यालयातील जेष्ठ विज्ञान शिक्षक व प्रगतीशील शेतकरी श्री रामदेव बडगुजर यांच्या मातोश्री कै. गं. भा. सुशिलाबाई बडगुजर यांचे आज पहाटे 4.वा. दुःखद निधन झाले. माईच्या जाण्याने कळमसरे परिसरात शोककळा पसरली. आपल्या सकारात्मक विचाराने माईने मुलाला सांभाळले. सुख दुःखात साथ दिली. जीवन एकटे कठतांना निर्भयपणे राहिल्या. मुलाने ही मातेची सेवा करुन ऋण फेडण्याचा प्रयत्न केला.सर्वांना घेऊन चालण्याची परोपकारी वृत्ती माईने आयुष्यभर जोपासली. माईच्या दुःखद निधनाने संपूर्ण गाव शोकाकुल झाले आहे. माईचे वय साधारणत: 65 होते. आज राहत्या घरापासून ठिक दुपारी 4 वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या परिवारावर आलेल्या दुःखात गावकरी ,आप्तेष्ट तसेच कळमसरे शाळेचे संचालक मंडळ व शिक्षवृंद सहभागी आहोत..