श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी मोफत औषध वाटप करण्याचा संकल्प
![]()


श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी मोफत औषध वाटप करण्याचा संकल्प
जळगांव जिल्हा केमिस्ट ड्रगीस्टचा उपक्रम..
अमळनेर प्रतिनिधी
जळगाव जिल्हा केमिस्ट ड्रगीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मा.सुनिल भाऊ भंगाळे यांच्या प्रेरणेने तसेच हभप मुरलीधर माऊली कळमसरेकर यांच्या संकल्पनेतून तसेच अमळनेर तालुका केमिस्ट बांधवांच्या अनमोल सहकार्यातून श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी मोफत औषध वाटप करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला, तस पाहता ऐन वेळेवर ठरुन देखील सचिन एजन्सी,श्री एजन्सी,मयूर मेडिकल,श्रीराम मेडिकल,लोकसेवा मेडिकल एजन्सी,श्री ड्रग्स हाऊस,दुर्गा मेडिकल वरील सर्व अमळनेर येथील केमिस्ट यांनी भरपूर प्रमाणात औषधी साठा उपलब्ध करून दिला त्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार तसेच सर्व मेडिसीन्स पोहच करण्यासाठी अमळनेर तालुक्याचे अध्यक्ष,सचिव तसेच सर्व पदाधिकारी सकाळी 7 वाजता उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही मनस्वी आभार.तसेच काही अपूर्ण गोष्टीची पूर्तता 40गाव तालुक्यातील अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी यांनी केली त्याबद्दल त्यांचेही मनस्वी आभार. विशेष आमचे चोपड्याचे हभप सोपान मामा यांनी वेळेवर त्यांच्या गाडीची व्यवस्था केली त्याबद्दल त्यांचेही विषेश आभार मानण्यात आले.
दिनांक 14 तारखेला सायंकाळी 4 वाजता प.पु.सखाराम महाराज (पूज्य प्रसादजी महाराज) यांच्या हातून मोफत औषध वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ चिखलठाण ता.कन्नड येथे करण्यात आला,नंतर रात्री ठीक 8 वाजता राजराय टाकळी ता.कन्नड येथे जवळ जवळ 150 भाविकांना मोफत औषध वाटप करण्यात आले त्यांनतर दिनांक 15 तारखेला प्रवरा संगम येथे विटनेर दिंडीतील 70 भाविक,वडाळा येथे चिंचोली दिंडीत 250 भाविक,अमळनेर हभप प्रकाश महाराज यांच्या अमळनेर दिंडीतील 150 भाविक,नगर येथे पाचोरा दिंडीतील 170 भाविक,तसेच 40गाव येथील 80 भाविक,नंतर बेलदारवाडी दिंडीतील 500 भाविक,तसेच मांदळी येथे दोनगाव व पारोळा दिंडीतील 350 भाविक,धरणगाव दिंडीतील 100 भाविक,करमाळा येथे दोनगाव येथील दिंडीतील 120 भाविक नंतर रस्त्यात अनोळखी दिंडीतील, जी दिंडी मिळाली त्यात नेवासा,संभाजीनगर,करमाळा अश्या अनेक दिंड्यातील अंदाजित 1000 भाविक अश्या जवळ जवळ 4000 भाविकांनी मोफत औषधांचा लाभ घेतला.
या सर्व वारकऱ्यांना तस पाहिलं तर MRP च्या हिशोबाने जवळ जवळ 1.50 लाख रुपयांची औषधी वाटण्यात आली, औषध घेत असताना एक मनस्वी आनंद सर्व भाविकांच्या चेहऱ्यावर दिसत होता,तो आनंद बघून आम्हालादेखील एक मनस्वी समाधान वाटत होते.सर्व वारकऱ्यांच्या वतीने महंत प्रा.हभप सुशिल महाराज,विटनेरकर (अध्यक्ष,अखिल भारतीय वारकरी मंडळ,जळगाव जिल्हा) ह.भ.प मुरलीधर माऊली कळमसरे (सदस्य, केमिस्ट असोसिएशन,जळगाव जिल्हा) यांनी आभार मानले.

