1 min read

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दोन दिवसात थकीत मानधन द्या अन्यथा प्रकल्प कार्यालयांसमोर तीव्र आंदोलन करणार

Loading

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दोन दिवसात थकीत मानधन द्या अन्यथा प्रकल्प कार्यालयांसमोर तीव्र आंदोलन करणार

थकीत मानधन देण्यास विलंब करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा.
राज्यासह जिल्ह्यातील सुमारे आठ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च २०२३ व एप्रिल २०२३ चे राज्य हिस्सा थकीत मानधन अदा करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपासमार थांबवावी म्हणून संघटनेच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सातत्याने सुरु होता.
परिणामी त्याची दखल घेत श्रीमती रूबल अग्रवाल आयुक्त,एकात्मिक बाल विकास सेवा योजना बेलापूर नवी मुंबई यांनी एबाविसेयो/का-३/लेखा/२४४७/२०२३-२४ दि.१६ जून २०२३ रोजीच्या पत्रान्वये थकीत मानधन दोन दिवसात अदा करण्याबाबत राज्यातील सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना आदेशित केले आहे.
असे असतांनाही काही प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मानधन मिळण्यास विलंब होत आहे. म्हणून हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करावी.अशी संघटनेची मागणी आहे
मा.आयुक्त नवी मुंबई यांच्या आदेशानुसार थकीत मानधन दोन दिवसांत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा न केल्यास अंगणवाडी कर्मचारी त्या त्या प्रकल्प कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करतील आणि होणाऱ्या परिणामांस संबंधित कर्मचारी जबाबदार राहतील. अशा इशारा संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *