1 min read

खडतर तपश्चर्येतून भूमीने साधले नीट परीक्षेत आपले ध्येय!!

Loading

खडतर तपश्चर्येतून भूमीने साधले नीट परीक्षेत आपले ध्येय!!

अमळनेर प्रतिनिधी
मितभाषी, अभ्यासू, उपक्रमशील शिक्षक श्री रंगराव पुंडलीक पाटील यांची मेहनती मुलगी कु. भूमी पाटील हिने नीट परीक्षेत 700 पैकी 665 गुण मिळवून अमळनेरचे नाव उज्ज्वल केले.
अनेक कौशल्य शिकत भूमी हिने शिक्षण पूर्ण केले. ग्लोबल येथील शाळेत 8 वी पर्यंत शिक्षण घेऊन प्रत्येक विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून भूमीने यशाचा मार्ग सतत मार्गक्रमीत ठेवला. 9 वी व 10 वी त नवोदय विद्यालयात शिक्षण घेतले. कोठा येथील अॅलन इन्स्टिट्यूट ला 10 वीत प्राविण असल्याने व शिष्यवृत्तीत मेरिट आल्याने टाॅपर बॅच ला नंबर लागला. 12 वी सायन्स एन. टी. मुंदडा काॅलेज अमळनेर येथे केले.
भूमीसाठी आईनेही खूप मेहनत घेतली. स्व: त कोठा येथे राहून मुलीला अनमोल सहकार्य केले. भूमी ची लहानपणापासून बेसीक तयारी करुन चाणाक्ष बाप कसा असू शकतो याची प्रचिती भूमीच्या यशामुळे दिसून आली. अनमोल संस्कार असलेले कुटुंब मुलांसाठी अगदी मूल्यवान व प्रतिभासंपन्न विचार रुजवितात. भूमीच्या सत्कार प्रसंगी मराठी लाईव्ह चे अतिथी संपादक एस.एच. भवरे व उपक्रमशील शिक्षक आर. जी. राठोड उपस्थित होते. भूमीशी चर्चा केली असता तीला उत्कृष्ठ सरकारी कॉलेजात म्हणजे के. एम. सारख्या महाविद्यालयात शिक्षण घेऊन डॉक्टर होऊन समाजाची सेवा करुन नविन संशोधन करायचे आहे. संत तुकारामांनी आपल्या अभंगात म्हटले आहे ” कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे हेवा. ” असे त्यांचे सुसंस्कारी कुटुंबात मुल मुली आहेत. भूमीच्या यशाने अमळनेरातील जिज्ञासू मुलांचे मनोबल उंचावले आहे.
तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *