1 min read

सुरज मोरेचे नीट (NEET) परीक्षेत यश

Loading

सुरज मोरेचे नीट (NEET) परीक्षेत यश

सर्वत्र अभिनंदन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) : नुकताच राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) चा निकाल लागला असून या परीक्षेत चौबारी येथील सुरज रवींद्र मोरे या विद्यार्थ्याने घवघवीत यश मिळविले आहे.
सुरज मोरे याला ७२० पैकी ५८७ गुण मिळाले असून तो पत्रकार रवींद्र मोरे यांचा चिरंजीव आहे. सुरजचे इयत्ता १ ते ५ वीचे प्राथमिक शिक्षण र.सा.पाटील विद्या मंदीर, अमळनेर येथे, इयत्ता ६ वी ते १० वीचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, भुसावळ येथे आणि ११ वी ते १२ वीचे शिक्षण एक्स नवोदय फाउंडेशन, वाराणसी येथे झाले आहे. त्याने ११ वी व १२ वीचे शिक्षण घेत असतानाच नीटच्या परीक्षेची तयारी केली होती आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने ५८७ गुण मिळवून उज्वल यश खेचून आणले. त्याच्या या यशाने त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *