1 min read

मुंबईतील शिक्षकांना पी एफ पावत्या देण्यास सुरुवात

Loading

मुंबईतील शिक्षकांना पी एफ पावत्या देण्यास सुरुवात

भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई ,ठाणे(मनिलाल शिंपी) मुंबईतील शाळा व ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक-शिक्षकेतरांना भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या (पीएफ स्लिप) देण्यास सुरुवात झाली असून भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक व मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्यामुळे शिक्षकांना त्यांच्या पी एफ खात्यातील रकमेचे तपशील मिळणार आहेत.
वर्ष २०२०-२१ पर्यंतच्या भविष्य निर्वाह निधीच्या पावत्यांचे वाटप शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभागाच्या वतीने करण्यात आले असून आतापर्यंत ६० शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतरांना स्लिप चे वाटप झाले असून उर्वरित शाळा व ज्युनिअर कॉलेज मधील पावत्या वाटप करण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे.
शिक्षकांच्या वेतनातून दरमहा पी एफ ची रक्कम कपात होत असते व वर्षाच्या शेवटी जिल्हा वेतन पथक कार्यालयातून वर्षभराचा जमा रकमेची संपूर्ण माहिती पी एफ स्लिप मधून शिक्षकांना मिळत असते. यामध्ये पी एफ मध्ये किती रक्कम आहे किती रक्कम कपात होते आहे याचे तपशील शिक्षकांना मिळत असते. अनेक शिक्षक पी एफ मधून गृह खरेदी, घरदुरुस्ती, लग्नकार्य तसेच औषधोपचार साठी कर्ज काढत असतात यासाठी पी एफ पावत्यांची गरज भासते.
यापुढे भविष्यात आता पीएफ च्या स्लिप शालार्थ मधूनच मिळणार असल्याने शिक्षक आता केव्हाही त्यांची रक्कम व पीएफ चा तपशील पाहू शकणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *