आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा इंग्लंडमध्ये सत्कार समारोह संपन्न.
![]()


आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा इंग्लंडमध्ये सत्कार समारोह संपन्न.
*मुंबई,ठाणे ( मनिलाल शिंपी ):कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आपल्या सर्वांचे लाडके आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा इंग्लंडमध्ये morly इंडियन च्या वतीने सत्कार समारंभ आयोजित आज केला होता* *या सत्कार समारंभा प्रसंगी भारतातील अनेक राज्यातील लोक उपस्थित होते, "ज्ञानासाठी सदैव जागू" ! या उक्तीप्रमाणे सदैव कार्यरत असणारे , अन्यायविरुद्ध आवाजज उठवणारे ,शिक्षक शिक्षकेतरांसाठी अहोरात्र मेहनत करणारे, आंदोलनात सहभाग घेऊन शिक्षक शिक्षकेतरांना न्याय मिळवून देणारे, आर्थिक अडचणीमध्ये असलेल्या गोरगरीब शिक्षक बांधवांना नेहमीच मदत करणारे, हजारो शिक्षक- शिक्षकेतरांची वैयक्तिक कामे करून देणारे, कोरोना काळात समाजाचे केली सेवा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे, गोरगरीब विद्यार्थ्यांची सेवा शाळेच्या माध्यमातून करणारे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वतःच्या शाळेत घडवणारे, उत्तम प्रशासक, कनवाळू, दयाळू सर्वांच्या मदतीला धावून जाणारा, प्रत्येकाला हवा हवा असं वाटणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून नावा रूपाला आलेले व्यक्तिमत्व , या व्यक्तिमत्वाची दखल घेऊन इंग्लंड मधील morly इंडियन च्या वतीने इंग्लंड आज आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचा मानपत्र , पुष्पगुच्छ, इंग्लंड पार्लमेंटचे प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला* *याप्रसंगी भारताचा ध्वज हातामध्ये घेऊन "भारत माता की जय" ! आणि "वंदे मातरमचा" जयघोष करण्यात आला उपस्थित नागरिकांनी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांना खूप खूप शुभेच्छा दिल्या, भारताची संस्कृती आणि संस्कार जपण्यासाठी सदैव प्रयत्न करीत राहावे, देशात आरोग्य , शिक्षण याला महत्त्व द्यावे, प्रादेशिक भाषा शाळेत टिकून राहाव्यात, मराठी ,हिंदी ,उर्दू , तेलुगु, गुजराती सर्व शाळा टिकवाव्यात अशी अपेक्षा इंग्लंड मधील नागरिकांनी केली ,भाषेचे आणि देशाचे महत्त्व परदेशामध्ये नागरिकांना किती महत्त्वाचे मोलाचे आहे, त्या ठिकाणी पहावयास मिळाले, भारतीय नागरिक असल्याचा अभिमान सर्वांनी बोलून दाखवला* *इंग्लंड मधील नियम, शिस्त, स्वच्छता, शैक्षणिक प्रगती,प्रत्येकाच्या कामाला महत्त्व , जुन्या काळातील वस्तूंचे संवर्धन आपल्या भारत देशात सुद्धा व्हावे , याकरता प्रयत्न व्हावेत अशी अशा अनेकांनी व्यक्त केली*

