1 min read

संभाजीनगरातील साहित्यातील दिग्गज कवी फ.मू. शिंदे प्रा. कौतिकराव ठाले पाटील श्री बाबा भांड यांची शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट

Loading

संभाजीनगरातील साहित्यातील दिग्गज कवी फ.मू. शिंदे प्रा. कौतिकराव ठाले पाटील श्री बाबा भांड यांची शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट

छत्रपती संभाजीनगर येथे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य सचिव प्रा. डॉ. सुभाष बागल फाउंडेशनचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा संपर्कप्रमुख अँड सर्जेराव साळवे यांनी नुकतेच सुप्रसिद्ध कवी फ.मु.शिंदे सर तसेच बालसाहित्यिका प्रा.लीलाताई शिंदे त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. कौतिकराव ठाले पाटील सर त्याचप्रमाणे साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबईचे माजी अध्यक्ष व साकेत प्रकाशनाचे प्रकाशक सुप्रसिध्द साहित्यिक श्री बाबा भांड सर यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना उज्जैनकर सर लिखित प्रबोधनाची ज्ञानदिंडी हा ग्रंथ भेट देण्यात आला याप्रसंगी श्री बाबा भांड यांनी सुद्धा त्यांचे खडक पालवी हे पुस्तक उज्जैनकर सर यांना व अँड सर्जेराव साळवे यांना सप्रेम भेट दिली याप्रसंगी साहित्यातील या दिग्गजांनी विविध विषयावर चर्चा केली आणि शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे कार्य हे खूप छान असून समाज सेवा साहित्य सेवेत सतत अग्रेसर असल्याचे सर्व मान्यवरांनी डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचे मनापासून कौतुक केले.
तसेच सुप्रसिद्ध पत्रकार तथा कवी डी. बी जगतपुरिया यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या 75 री निमित्त डॉ शिवचरण
उज्जैनकर व अँड सर्जेराव यांनी शाल, श्रीफळ व पुस्तक भेट देऊन आणि टोपी घालून सरांचा सत्कार केला तर वाडीकर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे मालक श्री मदनजी दराडे श्री गजानन उंबरकर यांच्या सुद्धा निवासस्थानी डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी यांना सुद्धा उज्जैनकर संपादित प्रबोधनाची ज्ञान दिंडी हे पुस्तक भेट देण्यात आले प्रसंगी फाउंडेशनचे छत्रपती संभाजीनगरचे संपर्कप्रमुख अँड सर्जेराव साळवे यांच्या निवासस्थानी सौ. सुरेखा साळवे पोलीस कॉन्स्टेबल नितीन वाकोडे चि. प्रशिक साळवे यांनी उज्जैनकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच वकील संघाचे जिल्हा सदस्य अँड शरद भदाणे तसेच श्री संजय साळवे व सौ. वैशाली साळवे यांच्या निवासस्थानी सुद्धा उज्जैनकर सर यांचा शाल.श्रीफळ व टोपी घालून सत्कार करण्यात आला याप्रसंगी फाउंडेशनचे राज्यसचिव प्रा. डॉ. सुभाष बागल सर छत्रपती संभाजीनगर जिल्हा संपर्कप्रमुख अँड सर्जेराव साळवे चि. ओम उंबरकर सौ. ज्योतीताई उंबरकर यांची विशेष उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *