1 min read

विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालयात मानव विकास कार्यक्रमांतर्गत ताईसो स्मिताताई वाघ मा. आमदार ( विधान परिषद ) यांच्या हस्ते मुलींना मोफत सायकलींचे वाटप

Loading

विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालयात मानव विकास कार्यक्रमांतर्गत ताईसो स्मिताताई वाघ मा. आमदार ( विधान परिषद ) यांच्या हस्ते मुलींना मोफत सायकलींचे वाटप

करणखेडा विद्यालयात मानव विकास कार्यक्रम 2022 – 23 अंतर्गत इ.8 ते 10 पर्यंतच्या 2 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरून येणाऱ्या मुलींना 22 मोफत सायकलींचे वाटप ताईसो,स्मिताताई वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी ताईसो स्मिताताई वाघ ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या, त्यांची अमळनेर विधानसभा निवडणूक प्रमुख पदी निवड झाल्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष आबासो जयवंतराव पाटील अध्यक्ष (ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आपल्या मनोगतात ताईंनी मुलींना सायकलींचा वापर शिक्षणाकरिता येण्या – जाण्या च्या कामासाठी अगत्याने करावा, मुलींनी सायकली विकू नयेत. आपल्या लहान भाऊ,बहीण यांना शाळेत येण्या जाण्यासाठी द्याव्यात. मुलींनी खूप शिकावे व मुख्य प्रवाहात सामील व्हावे, यासाठी अनेक दाखले दिलेत. व मार्गदर्शन केले तसेच विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागल्यामुळे शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री पी. ए. सोनवणे व पवार सर (प्रभारी मुख्याध्यापक) यांचा सत्कार केला. इ.10 मध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी कु. समीक्षा किशोर पाटील हिचा देखील सत्कार केला. तसेच पंचायत समिती अमळनेर च्या वतीने यावर्षी करणखेडे विद्यालयाचे श्री. आनंदा बापू धनगर सर यांना (आदर्श शिक्षक पुरस्कार) मिळाल्याने त्यांचा देखील सत्कार केला. तसेच शिक्षक प्रतिनिधी मधून श्री प्रशांत पाटील सरांचा देखील सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात आबासाहेब जयवंतराव पाटील यांनी शाळेच्या कामकाजाब बाबत समाधान व्यक्त केले. व मुलींना प्रेरणा देण्यासाठी खूप शिकण्यासाठी प्रोत्साहित केले.
याप्रसंगी ग्राम विकास शिक्षण मंडळाचे (अध्यक्ष)आबासो श्री.जयवंतराव पाटील, (उपाध्यक्ष)आबासो श्री.देविदास पाटील, (ऑनररी सचिव) आबाजीसो श्री.देविदास पाटील, नानासो श्री.साहेबराव पाटील, बापूसो श्री.महारु सिसोदे, नानासो श्री,वाय. के. पाटील, अण्णासो डॉ.श्री. सुरेश साळुंखे,भैय्यासो श्री.दिनेश साळुंखे, दादासो श्री. चंद्रकांत शिसोदे, आबासो श्री. विश्वासराव पाटील, अण्णासो श्री. लोटन पाटील, दादासो श्री.मनोज साळुंखे, दादासो श्री. सुरेश शिंदे, दादासो श्री आर. एफ.पाटील व नानासो श्री. के.व्ही. पाटील तसेच करणखेडा गावच्या सरपंच श्रीमती कविता पाटील व उपसरपंच श्रीमती कविता धनगर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी हातभार लावला सूत्रसंचालन श्री.एन. एस. पवार सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *