1 min read

अर्बन बँक च्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या सर्वाधिक जागा

Loading

अर्बन बँक च्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या सर्वाधिक जागा

अर्बन बँक च्या निवडणूकीत अनेकांची प्रतिष्ठा पनाला

अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक अमळनेर पंचवार्षिक निवडणूक 2023 28 नुकतीच मतदान झाले व आज मतमोजणी झाली त्या मतमोजणी सहकार पॅनलच्या13 पैकी 11 जागा आल्या.
अर्बन बँक च्या निवडणुकीमध्ये अनेक मातब्बर उमेदवार या निवडणुकीमध्ये उतरलेले होते व अनेकांसाठी ती प्रतिष्ठेची झालेली होती काही उमेदवारांनी मतदारांना खुश करण्यासाठी पैसे दिले होते पण अमळनेरच्या शहरात हिंदू मुस्लिम दगडफेक झाल्यामुळे त्याचा परिणाम मतदानाच्या दिवशी झाला व मतदानाची टक्केवारी घसरली व मतदान सर्वात कमी मतदान झाले. कमी मतदानामुळे अनेक मातब्बर उमेदवारांची हिरमोड झाली व काही उमेदवारांनी मतदारांना पैशांचे प्रलोभन दिले होते. कमी मतदान झाल्यामुळे त्याचा फटका काही उमेदवारांना बसला.
सर्वसाधारण मतदारसंघात विजयी उमेदवार
प्रवीण जैन, पंकज मुंदडे, लक्ष्मण महाजन भरतकुमार ललवानी, प्रदीप कुमार अग्रवाल, दीपक साळी ,अभिषेक पाटील, प्रवीण पाटील,

महिला राखीव मतदार संघात विजयी उमेदवार
वसुंधरा दशरथ लांडगे व मनीषा लाठी

ओबीसी मतदारसंघात
पंडित नाना चौधरी

भटक्या विमुक्त जाती विजयी उमेदवार मोहन सातपुते

अनुसूचित जातीत जमाती मतदारसंघात
रणजित शिंदे
हे सहकार पॅनलचे 11 व इतर दोन उमेदवार निवडून आले आहेत. अनेक विजयी उमेदवारांनी आनंदोत्सव साजरा केला व अनेक मित्र परिवारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अमळनेर शहरामध्ये थोडी तणावपूर्ण शांतता होती तरीसुद्धा आनंद उत्सव उमेदवारांकडून कमी झाला नाही. मित्रपरिवारांनी आनंद उत्सव साजरा केला .पोलीस कर्मचारी यांनी शांतता सुव्यवस्था ठेवली.
व सर्व निवडणूक कर्मचारी यांनी निवडणुकीचे काम अमळनेर इंदिरा भवन येथे चोख पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *