1 min read

मानवसेवा ग्रुप तर्फे नाशिक येथे महिलांना साडी वाटप. डॉ.मनिलाल शिंपी यांचे कार्य कौतुकास्पद.

Loading

मानवसेवा ग्रुप तर्फे नाशिक येथे महिलांना साडी वाटप. डॉ.मनिलाल शिंपी यांचे कार्य कौतुकास्पद.

नाशिक ( प्रतिनिधी ):मानव सेवा हीच ईश्वर सेवा ग्रुप तर्फे प्रमुख डॉ मनिलाल शिंपी यांचा संकल्पनेनुसार ,आज गणेश मंदिर , पवननगर,सिडको नाशिक येथे, स्वामीनारायण मंदिर हॉलचे संचालक डॉ. दिनेश भाई ठक्कर, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील, ,ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रामचंद्र देसले,भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव डॉ यशवंत म्हात्रे,यांच्या सहकार्याने, झोपडीत, उन्हातान्हात कष्ट करून पोटाची खळगी भरण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या गरीब भगिनींना, डॉ. मनिलाल शिपी ,ॲड अविनाश माम्हूनकर यांचा हस्ते साडी वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी नाशिक शिंपी समाज महिला मंडळाचा सौ. अनिताताई बाविस्कर, सौ मायाताई मिलिंद चव्हाण यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीतेसाठी उत्कृष्ठ प्रकारे नियोजन करत मोलाचे सहकार्य केले. विश्व इंजिनिअरिंगचे किशोर अढळकर,यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच श्री.मिलिंद चव्हाण,श्री.प्रमोद बाविस्कर यांनी विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *