1 min read

जळगाला आम आदमी पार्टीने भाजपा सरकारच्या हुकूमशाहीचा केला निषेध..

Loading

आज दिनांक 11 5 2023 रोजी जळगाव आम आदमी पार्टीने भाजपा सरकारच्या हुकूम शाहिचा निषेध केला. दिल्लीमध्ये असलेली आम आदमीपार्टीची सरकार असून दिल्ली सरकारला कायदे करण्याचाअधिकार व नोकर शहांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार या संदर्भातली केस सर्वोच्च न्यायालयात चालू होती सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पार्टीच्या बाजूने निकाल देत भाजपा सरकारवर जोरदार टीका केली होती मात्र भाजपा सरकारने सर्व आदेश धुडकावत दंडलशाहीचा अवलंब करत दिल्ली सरकार विरोधात नवीन अध्यादेश जारी करीत आहे. हा लोकशाहीचा व संविधानाचा अपमान आहे. याकरता आम आदमी पार्टी संपूर्ण देशभर दंडलशाहीचा निषेध करीत आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्र प्रभारी व गुजरात राज्य प्रदेश अध्यक्ष माननीय गोपाल इटालिया यांच्या आदेशानुसार तसेच जळगाव जिल्हा अध्यक्ष माननीय तुषार जी निकम सर यांच्या नेतृत्वाखाली व महानगरप्रमुख योगेश हिवरकर मार्गदर्शनाखाली जळगाव आम आदमी पार्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक जवळ दंडेलशाहिचा निषेधध करण्यात आला यावेळी स्वराज्य यात्रा उत्तर महाराष्ट्र समन्वयक माननीय अभिजीत गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाभरातून सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते खालील प्रमाणे उपस्थित होते जळगाव जिल्हा सचिव डॉक्टर महेश पवार, रावेर तालुका अध्यक्ष युवराज महाजन, भुसावळ तालुकाध्यक्ष्ष प्रमोद पाटील, एरंडोल तालुका अध्यक्ष नामदेव पाटील, अमळनेर तालुकाध्यक्ष संतोष पाटील, मिलिंद चौधरी ,ओमप्रकाश अग्रवाल, दिलीप पाटील, डॅनी राजपूत, प्रमोद पाटील ,पवन खंबायत , रईस खान ,रईस कुरेशी, सोनल तिवारी ,सरिता तायडे ,रितेश सोनवणे अमृता नेतकर ,नाजीम कुरेशी, मिलिंद नवले , दुर्गेश निंबाळकर, विशाल कुंभार, विक्रम कापडणे, गोपाल शिंपी, व आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *