महाराष्ट्रातील राजकीय फेरबदल.
आव्हानास सारे नेते सज्ज !
![]()
महाराष्ट्रातील राजकीय फेरबदल.
आव्हानास सारे नेते सज्ज !
राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्त.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळेंची निवड; तर
वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड, भाई जगताप यांची उचलबांगडी.
निवडणूका जवळ येऊन ठेपल्या आहेत व राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील सत्तांतरामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. घटनाबाह्य सरकार म्हणून विरोधक आवाज उठवत आहेत तर दुसरीकडे आपलीच शिवसेना कशी योग्य आहे असा दावा मुख्यमंत्री शिंदे गट करत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या वतीने करण्यात आलेले दावे व उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या दाव्याचा निकाल लवकरच अपेक्षित आहे तो पर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूकीसाठी कंबर खचली आहे. दावे प्रतिदावे होत आहेत व त्यातच महाराष्ट्रातील दोन राजकीय पक्षांनी महत्त्वाचे बदल केले आहेत. ते म्हणजे सुप्रियाताई सुळे व प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्याकडे आलेल्या जबाबदारीचे.
मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नसून देशाची आर्थिक राजधानी आहे व मुंबई महानगर पालिकेवर सर्वच पक्षांच्या नजरा आहेत. व मुंबईवर आपला झेंडा फडकविण्यासाठी सारेच पक्ष आसुसलेले आहेत.
महाविकास आघाडी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या बरोबरीने शिवसेना यांच्यात जागा वाटपा संदर्भात एक वाक्यता नाही. एकला चलोचा नारा मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी दिला होता या पार्श्वभूमीवर नव्याने काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा प्राध्यापक वर्षा गायकवाड कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे मॅडम भविष्यात होणाऱ्या निवडणुका मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण कशा पद्धतीने राबविण्याची गरज आहे याकडे लक्ष देणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 25 वा वर्धापनदिन साजरा होत आहे, त्यानिमित्त दिल्लीतील सोहळ्यात आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली आहे.
वर्षा गायकवाड या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री होत्या. धारावी विधानसभा मतदारसंघाच्या त्या विद्यमान आमदार आहेत.
मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरुन भाई जगताप यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. तर माजी शिक्षणमंत्री आणि आमदार वर्षा गायकवाड यांच्याकडे मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के.सी. वेणुगोपाल यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. मुंबईसोबतच गुजरात आणि पाँडेचेरीमध्येही नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन महत्त्वाच्या बातम्या म्हणजे नुकत्याच होणाऱ्या निवडणुका झालेले राजकीय पक्ष बदल महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे मुंबई आणि मुंबई प्रदेशासाठी काँग्रेसने फार मोठा फेरबदल केला आहे भाई जगताप हे मुंबईचे काँग्रेसचे अध्यक्ष होते परंतु कोणती खबर न देता त्याजागी प्राध्यापक वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपले कार्याध्यक्षाची नियुक्ती करताना सुप्रियाताई सुळे यांच्याकडे सारीसुत्रे दिलेली आहेत या महत्वपूर्ण राजकीय घडामोडीमुळे महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळच वळण लागणार आहे.
भारतीय जनता पक्षाने मुंबई महानगर पालिका आपल्या हातात ठेवण्यासाठी रणनीती तयार केली आहे व त्यासाठी शिवसेना शिंदे गट हाताशी धरून उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला शह देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अधिकार दिले आहेत. दोन माझी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड व आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगर पालिका निवडणुकीतील रणधुमाळी ठरणार आहेत.
काँग्रेस पक्षाने वर्षा गायकवाड यांच्याकडे मुंबईची जबाबदारी देऊन महिला व दलित कार्ड आपल्याकडे ठेवले आहे अशी प्रतिक्रिया आरती शर्मा यांनी व्यक्त केली तर मुंबई महानगर पालिका ही उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आहे व ती भविष्यातही राहील असा आत्मविश्वास उपशाखाप्रमुख हितेंद्र राठोड यांनी व्यक्त केला.
हिंदुत्वाचा मुद्दा, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार या नेहमीच्याच मुद्दावर भविष्यातील निवडणुका पार पडल्या जातील हे सांगायलाच नको.

