केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले येत्या शनिवारी दिनांक 10 जुन रोजी नांदेडमधील दिवंगत अक्षय भालेराव यांच्या कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेणार
![]()

केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले येत्या शनिवारी दिनांक 10 जुन रोजी नांदेडमधील दिवंगत अक्षय भालेराव यांच्या कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेणार
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) नांदेड जिल्हयातील बोंडार हवेली गावातील दलित तरुण अक्षय भालेराव यांनी महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केल्याचा राग धरुन जातीवादी वृत्तीच्या लोकांनी अक्षय भालेराव यांचा अमानुषपणे खुन केला. या निंदनीय घटनेचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला असुन तसेच या घटनेबाबत संपूर्ण राज्यातील आंबेडकरी जनतेमधुन निषेध आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभुमीवर उद्या शनिवार दि. 10 जुन रोजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले हे नांदेड जिल्हयातील बोंडार हवेली गावातील खुन झालेल्या दलित तरुण अक्षय भालेराव यांच्या कुटुबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.
नांदेड जिल्हयातील बोंडार हवेली या गावातील दलित तरुण अक्षय भालेराव यांच्या पुढाकारातुन महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली होती. या गावात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती बाबत अनेकदा वाद झालेले आहेत. यावर्षी दलित तरुण अक्षय भालेराव यांनी पुढाकार घेवुन महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करुन मिरवणुकही काढली. त्याबाबत येथील जातीवादीवृत्तीच्या लोकांनी मनात राग ठेवुन दलित तरुण अक्षय भालेराव याच्या पोटात खंजीर खुपसुन त्यांची निर्घुण हत्या केली. ही घटना अमानुष असुन माणुसकीला काळीमा फासणारी आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेवर काळीमा फासणारी घटना आहे. या घटनेचा तिव्र निषेध रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केला आहे. या पार्श्वभुमीवर जातीवादी मारेक-यांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. दिवंगत दलित तरुण अक्षय भालेराव याच्या कुटुंबाला शासनाने तातडीने सांत्वनपर आर्थिक मदत करायला पाहिजे. त्याच्या कुटुंबाचे पुनर्वसन केले पाहिजे. कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी दिली पाहिजे. त्याबाबत ना. रामदास आठवले हे उद्या दिनांक 10 जुन रोजी नांदेडमधील दिवंगत अक्षय भालेराव यांच्या कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेणार

