1 min read

मधुमेह मुक्त भारत अभियानांतर्गत श्रम साधना ट्रस्ट चे बांभोरी इंजिनीअरिंग कॉलेज बांभोरी जळगांव येथे प्रि डायबेटिस आणि उच्च रक्तदाब तपासणी आणि व्याख्यान संपन्न..

Loading

मधुमेह मुक्त भारत अभियानांतर्गत श्रम साधना ट्रस्ट चे बांभोरी इंजिनीअरिंग कॉलेज बांभोरी जळगांव येथे प्रि डायबेटिस आणि उच्च रक्तदाब तपासणी आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्याचे सुप्रसिध्द निसर्गोपचार तज्ञ आणि मधुमेह समुपदेशक नरेंद्र पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. योग्य आहार विहाराचे पालन करून मधुमेह, रक्तदाब आणि इतर जीवनशैली निर्मित आजारांना पळवून लावता येऊ शकत असे त्यांनी सांगितलं. प्रसंगी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
संस्थेचे प्राचार्य जी के पटनायक यांनी नरेंद्र पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच प्रदीप सोलंकी सरांनी दुर्गेश निंबाळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संस्थेकडून प्रिन्सिपल. जी.के.पटनाईक डॉ. काझी सर, डॉ. एस ए ठाकूर, डॉ. प्रदीप सोलंकी, डॉ दामले सर, अमोल वाणी सर ,एस एच राजपूत, मिलिंद बिऱ्हाडे तर अनुयश आरोग्य प्रतिष्ठान तर्फे स्वास्थ प्रचारक दुर्गेश निंबाळकर, डॉ. अविनाश सूर्यवंशी, नगमा मणियार यांनी कार्यभार पाहिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *