1 min read

इ.१२वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग.

Loading

इ.१२वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग.

जळगांव प्रतिनिधी (प्रा.अतुल इंगळे): शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी इ.१२वी मध्ये सध्या शहरात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग पहावयास मिळत आहे. गेल्या महिन्यात इयत्ता अकरावीचा वार्षिक निकाल जाहीर झाल्यानंतर सध्या इ.१२वीच्या विविध ज्ञान शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी
के.सी.ई.सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे गर्दी करत असताना दिसून येत आहे. उन्हाचा प्रकोप लक्षात घेता महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीची वेळ सकाळी अकरा ते दुपारी दोन पर्यंत असल्याने विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सकाळीच लवकर नंबर लागावा यासाठी महाविद्यालयांत उपस्थिती असल्याचं उत्साहवर्धक चित्र सध्या शहरात सर्वच कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालयात दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *