महाराष्ट्र शासन वन विभाग टीमच्या उपस्थितीत साई इंग्लिश अकॅडमितर्फे
जागतिक पर्यावरण दिवस साजरा
![]()


महाराष्ट्र शासन वन विभाग टीमच्या उपस्थितीत साई इंग्लिश अकॅडमितर्फे
जागतिक पर्यावरण दिवस साजरा
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर-येथील साई इंग्लिश
अकॅडमितर्फे आज 5 जून रोजी –
जागतिक पर्यावरण दिन सोहळा
साजरा करण्यात आला.सोहळ्यास
महाराष्ट्र शासन वन विभाग टीमची
उपस्थिती लाभली.सोहळ्याचे
अध्यक्ष-बळवंत विठ्ठल पाटील-
वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक
वनीकरण,अमळनेर तसेच
पी.जे.सोनवणे-वनपाल
तसेच आय.टी.चव्हाण-वनपाल
वैशाली साळी मॅडम-वनपाल
सामाजिक वनीकरण,अमळनेर
तसेच रामदास वेलसे,सीमा शिंदे
मॅडम,दिनेश देवरे व संपादक
डॉ.विलास पाटील हे उपस्थित
होते.सोहळ्याचे अध्यक्ष
बळवंत पाटील यांनी आपल्या
अध्यक्षीय भाषणात म्हटले –
पर्यावरणाच्या अनेक समस्या सध्या
जगभरात जाणवत आहेत.त्यासंदर्भात
जनमानसांत जागरूकता निर्माण
व्हावी,यासाठी दरवर्षी जागतिक
पर्यावरण दिन साजरा केला जातो.
कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्व
आपल्याला समजले, वृक्ष हेच
ऑक्सिजन-प्राणवायूचे प्रमुख स्त्रोत
आहेत…म्हणूनच जास्तीत जास्त वृक्ष
आपण लावली पाहिजेत,ती जगवली
पाहिजे.ह्या प्रसंगी साई इंग्लिश
अकॅडमिच्या विद्यार्थ्यांना रोपे
वाटण्यात आली.
विद्यार्थ्यांनीसुद्धा मनोगतात
सांगितले-आम्हाला मिळालेली
रोपे आम्ही आजच आमच्या घराच्या
बागेत,परिसरात,शेतात व इतरत्र लावू.
रोपांची काळजी घेऊन,संगोपन करून
रोपांचा वाढदिवस साजरा करू.
सोहळ्याचे प्रास्ताविक साई इंग्लिश
अकॅडमि संचालक-भैय्यासाहेब मगर
यांनी केले.सूत्रसंचालन व आभार
कु.प्रियंका बारी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अकॅडमिचे
पूर्वा देसले,कल्याणी पाटील,सनय
पाटील,वेदांत जाधव,भावेश सरोदे,
भावेश पाटील,वेदांत पाटील,साई
पाटील,दिग्विजय पाटील,श्लोक
सूर्यवंशी यांनी प्रयत्न केले.

