रिक्षा चालकाचा मुलगा उच्च शिक्षणाकरिता जर्मनीला रवाना
रिक्षा चालक सूर्यकांत( आबा) शिरसाट यांचा मेहनतीला यशस्वी फळ
![]()

रिक्षा चालकाचा मुलगा उच्च शिक्षणाकरिता जर्मनीला रवाना
रिक्षा चालक सूर्यकांत( आबा) सिरसाठ यांचा मेहनतीला यशस्वी फळ
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी ) प्रतिनिधी — डोंबिवली पूर्व मधील रिक्षा चालक श्री.सूर्यकांत गुलाबराव सिरसाठ हे गेल्या ४०/४५ वर्षापासून प्रामाणिकपणे रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करीत आहेत. हलाखीची परिस्थितीतआपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन आज त्यांचा सुपुत्र कु. दुर्वेश सूर्यकांत शिरसाट यांस नुकतेच जर्मनी येथे एर्लागंन न्यूर्नबर्ग शहरातील फेडरिक अलेक्झांडर युनिव्हर्सिटी येथे दोन वर्षासाठी मास्टर ऑफ सायन्स इलेक्ट्रो मोबिलिटी या शिक्षणासाठी ऍडमिशन मिळाले आहे.त्यांचे वडील सध्या डोंबिवलीत रिक्षा चालक असून त्यावर आपली उपजविका चालवत आहेत. रिक्षचालकाचा मुलगा शिक्षणासाठी जर्मनी गेल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.दूर्वेश चे प्राथमिक शिक्षण डोंबिवली येथे झाले,शिक्षणाची आवड असणाऱ्या दूर्वेश ला पुढील शिक्षणासाठी जर्मनी पाठविण्यासाठी त्याच्या आई वडिलांना आर्थिक अडचण होती परंतु शासन तर्फे स्कॉलरशिप मिळाल्या मुळे त्यास जर्मनी पाठविणे सोयीस्कर झाले.स्कॉलरशिप मिळाल्यामुळे आता त्यांना फक्त तेरा हजार रुपये प्रति सेमीस्टर ऐवढा खर्च येणार असल्याचे त्याच्या आई वडिलांनी सांगितले. दूर्वेश च्या विदेश वारीने शिंदखेडा येथील त्याचे मामा अमोल शिंपी व त्यांचा परिवार तसेच संपूर्ण शिंपी समाजा व मित्र परिवारा तर्फे दूर्वेशच्या उज्वल भवितव्यासाठी ,मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी,दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील, डोंबिवली रोटरी चे सचिव डॉ.किशोर अढळकर, भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे आणि कल्याण डोंबिवली मधील सर्व रिक्षा चालक मालक संघटनांकडून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.

