1 min read

अचानक वादळी वाऱ्यामुळे भडणे येथे केळी पिकाचे नुकसान

Loading

अचानक वादळी वाऱ्यामुळे भडणे येथे केळी पिकाचे नुकसान
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे दिनांक 4 जून रोजी दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे भडणे परिसरातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
जून महिना नुकतंच सुरू झालाय, जून उजाडला तसं मान्सून पूर्व वादळी वारा पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहेत मान्सून पूर्व वादळी वाऱ्यासह भडने सोनसेलु मेथी साळवे परिसरात परिसरात वादळी वाऱ्यामुळे जोरदार झाड पिकांची नुकसान झाले
गेल्या काही दिवसांपूर्वी तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. मात्र दि.०४ जून रविवार रोजी सकाळी 12 वाजे पर्यंत अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. शेतकरी शेतात आपल्या कामात व्यस्त असताना अचानक आलेल्या
वाऱ्यामुळे चारा तसेच भडने येथील प्रगतशील शेतकरी पविन जगन्नाथ माळी यांचे मालकीचे शेतात 2एकर केळी पिकांचे लागवड केली होती सगळा पैसा केळी पिकास लावून उत्पन्न येईल या आशेने खर्च केला तोंडात आलेला घास या वादळी वाऱ्यामुळे केळी पिक वाऱ्यामुळे खाली पडून केळीचे खांब जमिनदोस्त झाले आलेले उत्पन्न डोळे समोर जमीन दोस्त झाल्याने अक्षरशा शेतकरी शेतात पिक बघून डोळे गहिवरून आले तात्काळ त्यांनी घटनेची माहिती भडणे येथील पोलीस पाटील यांना दिले सदर पोलीस पाटील प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पिकांची पाहणी करून सदर घटनेची माहिती भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी यांनी तलाठी रुपेश कोळी व कृषी विभागाची कृषी सहाय्यक निंबा पाटील यांना कळवली
अचानक झालेल्या सुसाट वादळी वाऱ्यामुळे शेतातील निंबाचे झाड. अचानक आलेल्या वाऱ्यामुळे विद्युत खांब पडल्याने विद्युत तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. रविवार दुफारपासून वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी विद्युत पुरवठा व्यवस्थित करण्याच्या कामात व्यस्त होते.शेतातील विद्युत पुरवठा सोमवार सकाळ पर्यंत बंदच होता. अर्धा तास वादळी वाऱ्यासहजनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते.
चौकट,,,,,,भडणे येथे झालेल्या काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर झाले असून तोंडात आलेला घास या वादळी वाऱ्याने हिरावून नेल्याने शासनाने त्वरित पंचनामा करून मदत करावी अशी अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकरी
प्रवीण माळी
भडणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *