ठाणे जिल्ह्यातील १९६ शाळांमधील शिक्षकांचे थांबविलेले वेतन दोन दिवसात होणार
![]()
ठाणे जिल्ह्यातील १९६ शाळांमधील शिक्षकांचे थांबविलेले वेतन दोन दिवसात होणार
अनिल बोरनारे यांनी केली शिक्षणाधिकारी व वेतन अधिक्षकांशी चर्चा

आधार व्हॅलीडेशन केले नसल्याने थांबविले होते वेतन
ठाणे:कल्याण. (मनिलाल शिंपी) ठाणे जिल्ह्यातील ज्या शाळांचे आधार व्हॅलीडेशन चे ९५ टक्क्यांपेक्षा कमी काम झाले आहे अशा शाळांचे वेतन शिक्षणाधिकारी कार्यालयाने थांबविले होते याबाबत आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे यांनी ठाणे जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी व वेतन अधीक्षक यांच्याशी चर्चा केली या चर्चेत दोन दिवसांनी वेतन देण्याचे शिक्षणाधिकारी यांनी मान्य केले
ठाणे जिल्ह्यात खाजगी प्राथमिक शाळांची संख्या ४३० असून यातील १९६ शाळांचे आधार व्हॅलीडेशनचे काम अपूर्ण असल्याने वेतन थांबविण्यात आले होते याविषयीच्या तोंडी सूचना ठाणे शिक्षण अधिकाऱ्यांनी वेतन अधीक्षकांना दिल्या होत्या याबाबत ठाणे जिल्ह्यातील शिक्षक संघटना व शाळा प्रमुखांनी भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर लागलीच अनिल बोरनारे यांनी शिक्षणाधिकारी व वेतन अधिक्षकांशी संपर्क साधून वेतन थांबविलेल्या शाळांमधील आधार व्हॅलीडेशन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने तातडीने या १९६ शाळांचे वेतन अदा करण्याची मागणी केली
शिक्षकांनी उर्वरित विद्यार्थ्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहनदेखील अनिल बोरनारे यांनी शाळांना केले आहेत.

