येसगाव तालुका कोपरगाव येथे बेकायदेशीर रित्या वाहतूक करणाऱ्या आरोपींकडून 1 कोटी 34 हजार 40 रुपयांचा गुटखा जप्त…
![]()
पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या टीमची कामगिरी

येसगाव तालुका कोपरगाव येथे बेकायदेशीर रित्या वाहतूक करणाऱ्या आरोपींकडून 1 कोटी 34 हजार 40 रुपयांचा गुटखा जप्त…
पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या टीमची कामगिरी
कोपरगाव प्रतिनिधी
येसगाव ता. कोपरगाव येथे महाराष्ट्र राज्यात विक्री व वाहतुकीस प्रतिबंधीत असलेला गुटखा, पान
मसाला व सुगंधी तंबाखू बेकायदेशिररित्या वाहतुक करणारे आरोपी विरुध्द कारवाई करुन १००,३४,०४०/- किंमतीचा मुददेमाल जप्त कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन जि. अहमदनगर यांची
कारवाई मा.श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. श्रीमती स्वाती भोर अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर यांनी पोलीस निरीक्षक श्री वासुदेव देसले कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन यांना पोलीस स्टेशन हददीतील अवेद्य व्यवसायावर कारवाई करणेचे आदेश दिले असता, पोलीस निरीक्षक श्री वासुदेव देसले यांनी
अवेद्य व्यवसायीकांची माहीती घेत असताना त्यांना माहीती मिळाली की, इंदोर येथुन येवला मार्गे अहमदनगर
जिल्हयात महाराष्ट्र राज्य सरकार यांनी प्रतिबंधीत केलेला गुटखा हा आयशर कंटेनर रजिष्टर नंबर एम. पी. ०९
जी.जी. २९०० या मध्ये विक्री करणेचे उददेशाने वाहतुक होत आहे. अशा बातमीवरुन आयशर कंटेनरचा शोध
घेतला असता दिनांक ०२/०६/२०२३ रोजी रात्री २०:३५ वा. सुमारास येसगाव शिवारात नगर मनमाड रोडवर ता.
कोपरगाव येथे कंटेनर क्रमांक एम.पी. ०९ जी.जी. २९०० हा मिळुन आला आहे. सदर कंटेनर चालकाकडे
चौकशी करुन त्यास त्याचे नांव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नांव जमील अहमद इद्रीस अहमद वय ४५
वर्षे रा. रणसिका ता. हतीन जि. पलवल राज्य हरियाणा असे सांगीतले आहे. सदर इसमाचे कब्ज्यात वाहनासह
एकुण १००३४०४० रुपये किंमतीचा गुटखा जर्दा त्यामध्ये विमल, रजनिगंधा, राजश्री, पान मसाला गुटखा व
जर्दा असे वेगवेगळे कंपनीचा प्रतिबंधीत गुटखा मिळुन आला असुन त्याबाबत त्याचेकडे चौकशी करता, सदरचा
गुटखा हा इंदौर येथुन घेऊन पुण्याकडे जात असल्याची माहीती दिली आहे. याबाबत त्याचेविरुध्द कोपरगाव
तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. २८० / २०२३भा.द.वि.क.३२८,१८८,२७२,२७३, सह अन्न सुरक्षा माणके अधिनियम २००६ चे कलम २६(२)(आय) (व्ही) ५९ प्रमाणे रजिष्टरी दाखल करण्यात आला आहे. सदरआरोपीकडे खालील प्रमाणे प्रतिबंधीत गुटखा व वाहन मिळुन आले असुन त्यांचे वर्णन व किंमत खालीलप्रमाणे १९६०२००/-रु किमतीच्या ४५ सिलबंद गोण्या विमल पान मसाला गुटखा,किंमतीच्या ०९ सिलबंद गोण्या त्यात ब्लॅक लेबल टोबॅको,
किमतीच्या २० गोण्या राजश्री पान मसाला गुटखा २९७०००/-रु.
६३२०००/-रु.११०८०८०/-रु.४६६५६०/-रु१०१९१४००/-रु.२८८००/-रु.
किंमतीच्या ९ पांढरे रंगाच्या गोण्या रजनीगंधा पान मसाला
किमतीचे ३ पांढरे रंगाच्या गोण्यांमध्ये असलेले एकुण ६ कागदी बॉक्स १२० सिलबंद तुलसी 00 जर्दा
किंमतीचे ५ खाकी रंगाचे कागदी खोक्यामध्ये वि १ बिग तंम्बाकू
किंमतीचे ५ खाकी रंगाचे कागदी खोक्यामध्ये विमल पान मसाला गुटखा बिग पॅक असलेला
किंमतीचे बेसन ५० केजी नॉन रजि.ब्रॅण्ड (एस) अशा एकुण ६० बॅग,
३६ गोण्या पांढऱ्या रंगाच्या त्यावर इंग्रजीत एम के मिनी बारी वगैरे मजकुर त्यातील शुध्द आहार व शकाहार असे हिंदीत व इंग्रजीत प्रणव एंटरप्रायजेस असे नांव असलेल्या वजन २० किलो
किंमतीचा एक आयशर कंपनीचा कंटेनर रजिष्टर नंबर एमपी ०९ जी.जी २९०० असा असलेला.
५१,०००००/-रु १००,३४,०४०/ रु एकुण
सदर कारवाई मा. श्री राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर
पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, मा. श्री. संदिप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग, यांचे सुचना व
मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री वासुदेव देसले, पोलीस उप निरीक्षक
महेश कुसारे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सुरेश गागरे, पो.कॉ. अंबादास वाघ, पोकॉ. रशिद शेख, पो.कॉ.
जयदीप गवारे, पोना. रामा साळुंके यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस निरीक्षक वासुदेव
देसले यांचे मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे हे करीत असुन त्यांचे मदतीस सहाय्यक
पोलीस उपनिरीक्षक गजानन वांढेकर, पो.हे.कॉ राजेंद्र म्हस्के, पो. को युवराज खुळे, पो.कॉ. प्रकाश नवाळी, पोकॉ
किसन सानप, हे करीत आहेत.अशी माहिती वासुदेव देखले पोलीस निरीक्षक
कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन
अहमदनगर यांनी सांगितली.

