1 min read

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे ऑनलाइन प्रशिक्षण नोंदणी सुरू

Loading

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे ऑनलाइन प्रशिक्षण नोंदणी सुरू

शिक्षक भारती संघटनेचा यशस्वी पाठपुरावा
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करावे अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्याकडे केली होती. सदर मागणी मंजूर झाल्याने 12 वर्षे व 24 वर्ष सलग सेवेत पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिनांक 29 मे 2023 ते 12 जून 2023 पर्यंत नोंदणी करता येणार आहे अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी दिली आहे.

31 मार्च 2024 पर्यंत सेवेची 12 वर्षे व 24 वर्षे पूर्ण झालेले शिक्षक प्रशिक्षणासाठी नोंदणी करू शकतात. शिक्षकांचे स्प्रिंगबोर्ड ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
पात्र शिक्षकांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या लिंकवर नोंदणी करावी. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर जुलै महिन्यात प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

प्रशिक्षण नोंदणी लिंक
https://training.scertmaha.ac.in

प्रशिक्षण तपशील खालील वेबसाईटवर उपलब्ध आहे
www.maa.ac.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *