तालुका अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे उपकेंद्र-वडगांव बु व इतर गावामध्ये जलजन्य आजार होऊ नये म्हणून केली मान्सून पूर्व उपाययोजना
![]()


चोपडा प्रतिनिधी-
कालच तालुका अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे… आज उपकेंद्र-वडगांव बु व इतर गावामध्ये जलजन्य आजार होऊ नये म्हणून मान्सून पूर्व उपाययोजना मध्ये गावातील पाण्याची सर्व पाईपलाईन मोकळी करून वॉशआउट केली, पाण्याची टाकी धुणे,पाण्याची टाकी परिसर साफ करणे, व्हॉल्व गळती, पाईप गळती, तोटी नसलेले नळ, खोल खड्डे सर्वेक्षण केले व इतर सर्व बाबतीत सूचना देऊन स्वतः उभं राहून प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात आली. प्रसंगी जलसुरक्षक-भगवान पाटील, माजी सरपंच, सर्व ग्रामस्थ व आरोग्य सेवक-विजय देशमुख उपस्थीत होते.

