1 min read

मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा २३ जून रोजी मुंबईत..

Loading

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या  हस्ते मान्यवर पत्रकारांचा गौरव होणार

मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कारवितरण सोहळा २३ जून रोजी मुंबईत..

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मान्यवर पत्रकारांचा गौरव होणार

पुरस्कारार्थींमध्ये धुळ्याचे ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर यांचा समावेश

मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण शुक्रवार दिनांक 23 जून २०२३ रोजी मुंबईतील नरिमन पॉईंट यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते दुपारी साडेतीन वाजता होत आहे.. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे ही माहिती दिली आहे..

85 वर्षांची दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.. 2022 च्या पुरस्कारांचे वितरण 23 जून रोजी मुंबईत केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते केले जाणार आहे.. यावर्षी बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांना दिला जाणार आहे.. 25 हजार रुपये रोख मानपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.. यापुर्वी हा पुरस्कार दिनू रणदिवे, मा. गो. वैद्य, पंढरीनाथ सावंत आदि मान्यवर पत्रकारांना दिला गेला आहे..

जीवन गौरव पुरस्काराव्यतिरिक्त आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार कोल्हापूर लोकमतचे संपादक वसंतराव भोसले यांना, शशिकांत सांडभोर स्मृती पुरस्कार न्यूज 18 लोकमतचे मिलिंद भागवत यांना, प्रमोद भागवत शोध पत्रकारिता पुरस्कार सकाळचे मारूती कुंदले यांना, सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार मॅक्स महाराष्ट्रच्या प्रियदर्शनी हिंगे यांना, भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार धुळ्याचे ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर यांना, नागोजीराव दुधगावकर स्मृती पुरस्कार औरंगाबादचे ज्येष्ठ पत्रकार स. सो. खंडाळकर यांना, रावसाहेब गोगटे स्मृती पुरस्कार संगमेश्वरचे जेष्ठ पत्रकार जे. डी. पराडकर यांना, दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार अलिबागचे पत्रकार मोहन जाधव यांना दिला जात आहे..

पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, मुंबईचे विभागीय सचिव दीपक कैतके, मुंबई अध्यक्ष राजा आदाटे यांनी केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *