1 min read

आधार केंद्रांची संख्या कमी करून एचआयव्ही जीवन जगणाऱ्या व्यक्तींची हेंडसांड थांबवा..

Loading

आधार केंद्रांची संख्या कमी करून एचआयव्ही जीवन जगणाऱ्या व्यक्तींची हेंडसांड थांबवा..

एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या समुदायाचे स्थानिक व राष्ट्रीय प्रतिनिधी यांचे डॉ भारती पवार राज्यमंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र शासन यांना निवेदन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
2024/2027 साठीच्या योजनेमध्ये भारतातील काळजी व आधार केंद्रांची संख्या कमी करून 310 वरून 188 केल्यामुळे एचआयव्ही सह जीवन जगणाऱ्या व्यक्तींना पुरवल्या जाणाऱ्या सेवांच्या तरतुदीमध्ये अडथळा येत असल्याबाबत
भारतात सध्या एचआयव्ही सहज जगणाऱ्या व्यक्तींसाठी जिल्हा निहाय काळजी व सहाय्य केंद्र चालविण्यात येते ज्याद्वारे त्या व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबियांना आवश्यक त्या सर्व सेवा पुरवल्या जातात परंतु 2024 ते 27 साठीच्या योजनांमध्ये त्या केंद्रांची संख्या कमी करून 188 केल्यामुळे अनेक एचआयव्ही सहज जीवन जगणाऱ्या व्यक्तींना सेवा मिळणार नाहीत, याबाबत 22 मे 2023 रोजी एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या समुदायाचे स्थानिक व राष्ट्रीय प्रतिनिधी यांनी माननीय डॉक्टर भारती पवार राज्यमंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र शासन यांची त्यांच्या नाशिक येथील निवासस्थानी भेट घेऊन समस्या मांडल्या ग्लोबल फंड च्या आगामी नवीन टप्प्यात एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तींसाठी असलेले केंद्र कमी केल्यामुळे समुदायाबद्दलची चिंता त्यांच्या समक्ष सुनावणीसाठी मांडण्यात आली होती .माननीय मंत्र्यांनी प्रतिनिधींचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकले आणि अतिरिक्त सचिव यांच्यासोबत सुश्री हेकाली महासंचालक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्याकडून या संदर्भात स्पष्टीकरण मागितले आहे .माननीय मंत्र्यांनी एचआयव्ही संसर्ग कमी करण्यासाठी समुदायाने केलेल्या चांगल्या कामांची दखल घेतली आणि त्यांचे कौतुक केले. यासाठी सुश्री शबाना पटेल अध्यक्ष नेटवर्क ऑफ महाराष्ट्र बाय पीपल लिविंग विथ एच आय व्ही यांनी समाधान व्यक्त केले तसेच सध्याची काळजी व आधार सेवांमध्ये भारतातील सर्व एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तींचा समावेश असणे आवश्यक आहे याची खात्री करण्यासाठी त्यांनी मंत्रिमहोदयांना विनंती केली श्री महेंद्र मुळे अध्यक्ष नेटवर्क ऑफ नासिक बाय पीपल लिविंग विथ एच आय व्ही यांनी नाशिक जिल्ह्यातील एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या आठ हजार पाचशे व्यक्तींसाठी सातत्याने घेण्यात येणारी काळजी व त्यांचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न कायम ठेवल्याचे नमूद केले असून मंत्री महोदयांनी समुदायाचे प्रश्न संयमाने ऐकून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे मान्य केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला
जळगाव जिल्ह्यात एचआयव्ही सहज जीवन जगणाऱ्या व्यक्तींची संख्या आठ हजाराच्या घरात असून आधार बहुउद्देशिय संस्थे मार्फत काळजी व विहान केंद्र चालविले जाते व सर्व समुदायाला सेवा दिल्या जातात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *