ब्राम्हणशेवगे गावास युरोपियन देश नेदरलँडचा मदतीचा हात.
सेवा सहयोग फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारण व पर्यावरण प्रकल्पासाठी वेंडरलॅन्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची होत आहे आर्थिक मदत.
![]()


ब्राम्हणशेवगे गावास युरोपियन देश नेदरलँडचा मदतीचा हात.
सेवा सहयोग फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारण व पर्यावरण प्रकल्पासाठी वेंडरलॅन्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची होत आहे आर्थिक मदत.
चाळीसगाव / प्रतिनिधी
तालुक्यातील ब्राम्हणशेवगे या गावाची सन लोकसंख्या 2011 नुसार 3303 असून भौगोलिक क्षेत्र 2000 हेक्टर आहे. मुख्य व्यवसाय शेती असून पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन ई.जोड व्यवसाय आहे. तसेच उस तोडणी साठी अनेक कुटुंबे स्थलांतरित होत असतात.मुख्य पिक कपाशी असून बाजरी,ज्वारी, मका,कडधान्य इ.पिकही शेतकरी शेतात घेतात.तशी गावाची ओळख दुष्काळग्रस्त गाव म्हणून होती. सन 2016 ते 2019 या चार वर्षात भिषण दुष्काळी परिस्थिती गावाने अनुभवली. सन 2016-2017 या वर्षी ग्रामपंचायती मार्फत मन्याड धरणावरुन तात्पुरत्या स्वरुपात पाणी पुरवठा योजना राबवत गावाला पाणी पुरवठा करण्यात आला होता तर सन 2018-2019 साली अक्षरशः 25 किमी अंतरावरून टँकर द्वारा पिण्यासाठी पाणी आणावे लागले होते.या परिस्थितीची जाणीव ठेऊन सामाजिक कार्यकर्ते जल, पर्यावरण प्रेमी सोमनाथ माळी व ग्रामस्थ यांचे प्रयत्नातून जलसंधारण व पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
सेवा सहयोग फाऊंडेशन च्या माध्यमातून गुणवंतदादा सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली सन 2020 पासून साता समुद्रा पार असलेल्या युरोपियन खंडातील नेदरलँड या देशाच्या वेंडरलॅन्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या आर्थिक मदतीतून जलसंधारणाची कामे जशी नाला खोलीकरण,रुंदीकरण,
तसेच पर्यावरण रक्षणासाठी निसर्गटेकडी प्रकल्पासाठी एक गाव एक तलाव,चार बोअरवेल ज्यात रिचार्ज शाफ्ट, डिप सिसिटी,ठिबक संच,टँकर द्वारा पाणी पुरवठा ई.मदतीच्या माध्यमातून 23 हेक्टर क्षेत्रावर सामाजिक वनिकरण विभाग व लोकसहभागातून लावलेल्या 25000 पेक्षा जास्त झाडांना वाचवण्यासाठी मदतीचा हात दिला जात आहे. चाळीसगाव तालुक्यात भूजल अभियानामार्फत
कंपनीच्या आर्थिक मदतीने सुरु असलेल्या उपक्रमांची माहीती जाणून घेण्यासाठी व संवाद साधन्यासाठी वेंडरलॅन्ड कंपनीच्या युरोपियन देश नेदरलँडच्या प्रमुख फिक दि हाण या आल्या होत्या. त्यांचे समवेत Venderland India Pvt.चे
रश्मी चेतन , ऋषिकेशजी उपस्थित होते.
याप्रसंगी सेवा सहयोग फाऊंडेशन पुणे व भुजल अभियान प्रमुख गुणवंतदादा सोनवणे, माधुरी नागरस,शैलेश घाटपांडे,मनीषा शेलार,तुषार निरगुडे,प्रणव नाईक, नीलिमा ताई,श्रीरंग देशपांडे चाळीसगाव येथील भूजल अभियान टिमचे भोमराज राठोड, जिवराज राठोड, मालूताई राठोड राहूल राठोड तसेच ब्राम्हणशेवगे येथील सामाजिक कार्येकर्ते सोमनाथ माळी हे उपस्थित होते.

