1 min read

दापोडे गावचे सुपुत्र अभिजीत पाटील याचे केंद्रीय लोकसेवा आयोगात घवघवीत यश,अखेर आय.पी.एस होण्याचे स्वप्न साकार!

Loading

दापोडे गावचे सुपुत्र अभिजीत याचे केंद्रीय लोकसेवा आयोगात घवघवीत यश,अखेर आय.पी.एस होण्याचे स्वप्न साकार!

भिंवंडी दी.२४(स्व.रा.तो)
भिवंडी तालुक्यातील एक आदर्श गाव म्हणजे दापोडे गावची ओळख आहे, सांस्कृतिक क्षेत्र, कलाक्षेत्र, क्रीडा क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र ,शैक्षणिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये संपूर्ण पंचक्रोशीतच नव्हे तर ठाणे जिल्हा आदर्श निर्माण करून देणारे गाव म्हणजे दापोडे. याच दापोडे गावचा सुपुत्र कुमार अभिजीत तुळशीराम पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत घवघवीत यश संपादन करून आपल्या गावाबरोबर संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे नाव भारतात लौकिक केले आहे,
भिवंडी तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील माजी शिवसेना भिवंडी तालुकाप्रमुख ,एक सन्माननीय आदरणीय अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे श्री. तुळशीराम गणू पाटील होय, व दापोडे गावच्या माजी ग्रामपंचायत सद्स्या सौभाग्यवती आशा तुळशीराम पाटील यांचा सुपुत्र कुमार अभिजीत तुळशीराम पाटील यांनी पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण केली आहे,
सन २०२२ या वर्षातील केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल काल जाहीर करण्यात आला कुमार अभिजीत तुळशीराम पाटील याने सदर परीक्षेत घवघवीत यश संपादन करून ४७० वी रँक प्राप्त केली आहे आणि आता आयपीएस होण्याचे त्याचे स्वप्न साकार झाले आहे,
दापोडे गावचा हा सुपुत्र लहान पणापासून शहापूर या ठिकाणी शिक्षण घेत होता शहापूर मधील पी.एस.देशमुख इंग्लिश मीडियम शाळेत पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण अभिजीतने पूर्ण केले इयत्ता दहावी मध्ये देखील ९४ टक्के गुण अभिषेक ने प्राप्त केलेले होते बारावीनंतर बी टेक सिविल इंजीनियरिंग ही पदवी VJTI मुंबई येथून संपादन केली लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धी असलेल्या अभिजीतने यूपीएससी परीक्षा देण्याचे स्वप्न मनाशी बाळगले होते आणि पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण होऊन ठाणे जिल्हा, व भिवंडी तालुक्यातील सर्वांचा मान संपूर्ण भारत देशात वाढविला आहे . आई आणि वडील यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने तसेच शाळेतील शिक्षकांच्या सततच्या मार्गदर्शनाने मला हे यश मिळाले आहे असे अभिजीतने प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरणशी बोलताना सांगितले ठाणे जिल्ह्यातून सर्व स्तरातून अभिजीत वर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे, त्यामुळे त्याचे दैनिक स्वराज्य तोरण परिवार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुप,
स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा अशीच प्रगती यापुढेही करावी याच सदिच्छा. .. त्याचप्रमाणे त्यांनी आयपीएस च्या पुढे जाऊन आय एस होण्याचे स्वप्न साकार करावे अशी अपेक्षा दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. श्री.किशोर बळीराम पाटील यांनी व्यक्त केली आहे…

( आयपीएस अभिजीत पाटील यांचे मराठी लाईव्ह न्युज च्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *