1 min read

मुंबई दूरदर्शनच्या निवेदिका डॉ. दिपाली केळकर यांना उज्जैनकर फाउंडेशनचा तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदिका पुरस्कार सन्मानाने प्रदान

Loading

मुंबई दूरदर्शनच्या निवेदिका डॉ. दिपाली केळकर यांना उज्जैनकर फाउंडेशनचा तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदिका पुरस्कार सन्मानाने प्रदान

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन चा तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदिका पुरस्कार मुंबई दूरदर्शनच्या निवेदिका डॉ. सौ. दिपाली केळकर यांना नुकताच त्यांच्या मुंबई, बदलापूर येथील निवासस्थानी जाऊन संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर ठाणे जिल्हा समन्वयक श्री रमेश भाऊ उज्जैनकर जळगाव जिल्हा सल्लागार श्री मनोहरराव रोकडे आदींनी सौ. दिपालीताई केळकर यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि उज्जैनकर सर यांनी संपादित केलेले प्रबोधनाची ज्ञान दिंडी हे पुस्तक देऊन गौरव केला. या प्रसंगी सौ. दिपालीताई केळकर यांनी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. पुरस्कार त्यांना 27 फेब्रुवारी 2022 च्या राज्यस्तरीय पहिले शिव,बाल,किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन मुक्ताईनगर या ठिकाणी प्रदान करण्यात येणार होता परंतु त्या वैयक्तिक कारणांमुळे येऊ न शकल्याने हा पुरस्कार फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. दिपालीताई केळकर यांच्या निवासस्थानी मुंबई येथे जाऊन त्यांना सन्मानाने प्रदान केला. याप्रसंगी त्यांच्याशी एक तास विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *