1 min read

ठाणे जिल्ह्यातील १८ तलाठ्यांची मंडळ अधिकारी म्हणून नियुक्ती!
भिवंडीतील चार तलाठी झाले
मंडळ अधिकारी….

Loading

ठाणे जिल्ह्यातील १८ तलाठ्यांची मंडळ अधिकारी म्हणून नियुक्ती!
भिवंडीतील चार तलाठी झाले
मंडळ अधिकारी….

ठाणे:(मनिलाल शिंपी) जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय ठाणे येथून शुक्रवार दिनांक१९/५/२०२३ रोजी ठाणे जिल्ह्यातील १८ तलाठ्यांची त्यांच्या शासकीय सेवेतील कार्याची दखल घेऊन सेवाजेष्ठते नुसार मंडळ अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामध्ये भिवंडीतील चार तलाठी हे मंडळ अधिकारी या पदावर नियुक्त झाले आहेत, महसूल विभागात अत्यंत प्रामाणिकपणे गेली अनेक वर्ष काम करणाऱ्या तलाठ्यांमध्ये भिवंडीत भिवंडीचे तहसीलदार श्री.अधिक पाटील यांच्या अधिपत्याखाली काम करत असलेल्या खोणी तलाठी श्री. योगेश विठ्ठल भोजने, पूर्णा तलाठी श्री. सुधाकर गोपाळ कामडी, पडघा तलाठी श्रीमती प्रतिभा दिलीप चव्हाण, बोरिवली तर्फे राहुर तलाठी श्रीमती रोहिणी भिकाजी सावंत, यांचा समावेश असल्याची माहिती वडपे तलाठी श्री.गणेश पाटील आमचे प्रतिनिधी मनिलाल शिंपी यांचाशी बोलताना दिली, या सर्व मंडळ अधिकारी यांचे दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा यापुढेही त्यांच्या हातून चांगले कार्य घडावे अश्या सदिच्छा. देण्यात येत आहेत….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *