1 min read

दि.२२ मे रोजी
अमळनेर येथे स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन.

Loading

दि.२२ मे रोजी
अमळनेर येथे स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन.

अमळनेर दि. १९ – *राज्यातील महिलांकरिता विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती महिलांना उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तसेच त्यांच्या समस्यांचे व अडी .अडचणींचे निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता कार्यक्रम राबविण्याबाबत माननीय मंत्री महिला व बालकल्याण विभाग यांच्याकडून सूचने नुसार महिला व बाल विकास विभाग तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय आणि पंचायत समिती गट विकास अधिकारी .तहसीलदार . महसुल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रि शक्ती समाधान शिबिराचे आयोजन तालुका पातळीवर करण्यांत आले आहे*
.कार्यक्रमाचे ठिकाण -अमळनेर येथे दिनांक २२ मे २०२३ रोजी गंगाराम सखाराम (G.S.)हायस्कूल येथे सकाळी ९ ते दुपारी १२पर्यंत करण्यांत आले आहे.
समस्याग्रस्त व पीडित महिलांना व्यासपीठ मिळावे . शासकिय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहचवावा तसेच त्यांच्या न्याय हक्काचे संरक्षण होऊन महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी ! यासाठी महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो ! *महिला लोकशाही दिनाच्या धर्तीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरांत सदर तालुक्यातील महिलांनी आपले प्रश्न सोडवण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे . व या शिबीराचा तालुक्यातील महिलांनी लाभ घ्यावा. असे आवाहन तहसीलदार मा. श्री.रूपेशकुमार सुराणा व बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती. प्रेमलता पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *